Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

साऊथ तडका घेऊन येतोय ‘दसरा’! टीझरच्या प्रत्येक सीनमध्ये दिसते केजीएफ-पुष्पाची झलक

30

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार नानी याचा आगामी तेलुगु सिनेमा ‘दसरा’चा टीझर अलीकडेच प्रदर्शित झाला. सिनेमाच्या टीझरमधील दृश्यांत एका छोट्याशा गावातील एक मुलाचा त्याच्या लोकांसाठीचा संघर्ष दाखवला आहे. दसरा सिनेमातील अनेक दृश्यांमध्ये ‘पुष्पा’ची झलक दिसली आहे. असे असले तरी काही तासातच प्रेक्षकांनी हा टीझर डोक्यावर घेतला.

‘दसरा’ सिनेमाचा टीझरची सुरुवात वीरलापल्ली नावाच्या गावाच्या ओळखीनं सुरू होते. गावाच्या भोवती कोळशाच्या ढीगानं घेरलेला आहे. नानीच्या आवाजात सांगितलं जात आहे की, गावातील लोकांना दारू पिण्याची सवय नाही तर ते पिणं इथली परंपरा आहे.

हे वाचा-त्याने माझा हात हातात घेतला अन्… शाहरुखची भेट सायली संजीवसाठी ठरलेली खास

टीझरच्या शेवटी नानीच्या आवाजात दमदार आवाजात संवाद ऐकू येतात. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. एका युजरनं लिहिलं आहे की, ‘हा टीझर पाहिल्यावर अंगावर काटा आला.’ तर दुसऱ्या युजरंन लिहिलं आहे की, ‘नानी फक्त अभिनय नाही तर करत तर ती व्यक्तिरेखा तो जीवंत करतो.’ टीझर पाहिल्यानंतर अनेकांनी हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरणार असल्याचं कॉमेन्टमध्ये म्हटलं आहे. सिनेमाचं दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केलं आहे. या सिनेमात नानी याच्याशिवाय किर्ती सुरेश, संतोष नारायणन देखील दिसणार आहेत.

एसएस राजामौली यांनी डिजिटल रुपात टीझर प्रदर्शित केला. याशिवाय अभिनेता धनुष, शाहिद कपूर, दुलकर रसलमान आणि रक्षित शेट्टी आंनी देखील त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये टीझर प्रदर्शित केला आहे. हा सिनेमा ३० मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

हे वाचा-महेश मांजरेकरांचं घातलं प्रतीकात्मक श्राद्ध; दिग्दर्शकाविरोधात जोरदार घोषणाबाजी

नानीचा सर्वात मोठा सिनेमा

दसरा सिनेमातून तेलंगनामधील गोदावरीच्या खाणीमध्ये सिंगरेनी कोळसा खाणींच्याविरोधात आहे. अभिनेता नानीला या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहे. त्यानं अलिकडे सांगितलं होतं की, दसरा हा सिनेमा त्याच्या करीअरमधील सर्वोत्तम सिनेमा असणार आहे. त्याने अशी प्रतिक्रिया दिली की, ‘ज्यांना वाटते की मी कंफर्ट झोनच्या बाहेर काम करत नाही, त्यांना हा सिनेमा एकप्रकारे उत्तर असेल. या प्रोजेक्टकडून मला फार अपेक्षा आहेत आणि प्रेक्षक यानंतर नाराज होणार नाहीत असा विश्वास आहे’.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.