Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईकरांसाठी ‘अमृत’मार्ग; मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात आशादायी निधीवाढ

11

मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या स्थापनेपासून मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी (एमयूटीपी) आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे १ हजार १०१ कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर होण्यास मोठे बळ मिळणार आहे. राज्यात सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांसह, मार्गिकांचे दुहेरीकरण, चौपदरीकरण आणि १२३ स्थानकांचा अमृत योजनेंतर्गत विकास करण्यासाठी एकूण १३ हजार ५३९ कोटींची तरतूद करण्यात आली असून मागील अर्थसंकल्पात ती ११,९०३ कोटी होती.

मुंबई, ठाण्यासह, कर्जत, कसारा, मिरा रोड, विरार-डहाणू आणि पनवेलपर्यंत पसरलेल्या महानगरातील रेल्वे प्रकल्पांचा समावेश एमयूटीपी प्रकल्पात होतो. या प्रकल्पांसाठी केंद्राइतकाच निधी राज्य सरकारकडून पुरवला जातो. केंद्रीय अर्थसंकल्पात त्यासाठी गतवर्षीच्या तुलनेत यंदा ९१ टक्के अधिक निधी मिळाला आहे. यामुळे यंदा एमयूटीपी प्रकल्पांसाठी केंद्र-राज्य मिळून एकूण २२०२ कोटी इतका निधी उपलब्ध होणार आहे, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद गुप्ता यांनी सांगितले.

पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय २८ किमीची दुहेरी मार्गिका, ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका, विरार-डहाणू चौपदरीकरण या मुख्य प्रकल्पांचा समावेश असलेल्या एमयूटीपी-३ प्रकल्पसंचासाठी सर्वाधिक ६५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पनवेल-कर्जत नव्या उपनगरीय रेल्वे प्रकल्पाचे काम ३६ टक्के पूर्ण झाले आहे. विरार-डहाणू चौपदरीकरणाचे १६ टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वे रुळांवरील अपघात रोखण्यासाठी एमयूटीपी प्रकल्पसंचातून सुरक्षेचे उपाय राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पाचे निम्मे काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२४ अखेर बाकीचे काम पूर्ण होणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एमयूटीपी-३ अ या प्रकल्पसंचासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २३८ वातानुकूलित लोकलसह लोकल आणि मेल-एक्स्प्रेस यांची स्वतंत्र मार्गिका उभारण्यासाठी कल्याण यार्ड नूतनीकरणाचा समावेश यात आहे. हार्बर मार्गिकेचा बोरिवलीपर्यंत विस्तार, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका आणि उपनगरीय रेल्वे स्थानक सुधारणा या प्रकल्पांचा समावेश आहे.

एमयूटीपी-२ प्रकल्पसंचात सीएसएमटी-कुर्ला पाचवी सहावी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पसंचासाठी एकूण १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सीएसएमटी-कुर्ला मार्गाचे ४० टक्के पूर्ण झाले आहे.
——–
केंद्रीय अर्थसंकल्पातील एमयूटीपी प्रकल्पांसाठी तरतूद
वर्ष – तरतूद (कोटींमध्ये)

२०२३-२०२४ – ११०१

२०२२-२०२३ – ५७७

२०२१-२२ – ६५०

२०२०-२१ – ५५०
—–
मुंबई शहर परिवहन प्रकल्प तरतूद (आकडे कोटींमध्ये)

प्रकल्प – २०२३ – २०२२- २०२१-२०२०-२०१९

एमयूटीपी २ – १५०- १८७- २००-२००-२४४.९२

एमयूटीपी ३- ६५० – १९०- ३००-३००-२८३.७८

एमयूटीपी ३ अ- ३०० – २००- १५०-५०- ५०

*एमयूटीपी २ सी – १ कोटी

स्रोत- केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतूद रेल्वे पिंकबूक
——
राज्यातील नवीन रेल्वे मार्गिका

मार्ग – तरतूद (आकडे कोटींत)

कल्याण-मुरबाड (उल्हासनगरमार्गे-२८ किमी)- १००

अहमदनगर-बीड-परळी (२५० किमी)- २०१

वर्धा-नांदेड (पुसदमार्गे-२७० किमी) – ६००

सोलापूर-उस्मानाबाद (तुळजापूरमार्गे-८४ किमी)- ११०

बारामती-लोणंद (५४ किमी)- १००

फलटण-पंढरपूर (१०५ किमी) – २०
——-
स्थानक फलाट विस्तार

सीएसएमटी (फलाट १० ते १४) -१० कोटी

पुणे (२४ ते २६ डब्यांच्या रेल्वेगाड्यांसाठी) -२५ कोटी
……
दुहेरीकरण/चौपदीकरण होणारे मार्ग (आकडे कोटींमध्ये)

मार्ग – तरतूद

बेलापूर-उरण मार्गिका – २०

कल्याण-कसारा तिसरी मार्गिका- ९०

वर्धा-नागपूर तिसरी मार्गिका – १५०

पुणे-मिरज-लोणंद दुहेरीकरण -९००

मनमाड-जळगाव तिसरी मार्गिका-३५०

दौंड-मनमाड दुहेरीकरण – ४३०

जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका- २०

मनमाड-जळगाव तिसरी मार्गिका-३५०
………..
रेल्वे रुळांचे नूतनीकरण – १४०० कोटी

प्रवासी सुविधा – ७७६ कोटी

पूल आणि बोगद्यांची कामे – ११३ कोटी

सिग्नल देखभाल-दुरुस्तीसंबंधी कामे-२३७ कोटी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.