Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

येतोय कमी किंमतीचा स्वस्त Realme 10T 5G फोन

8

नवी दिल्लीः रियमली आपल्या नंबर सीरीजच्या नवीन ५जी फोनवर काम करीत आहे. ज्याला Realme 10T 5G नावाने लाँच केले जावू शकते. कंपनीने अजूनपर्यंत यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, हा फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह थायलंडच्या NBTC वेबसाइटवर लिस्ट आहे. सर्टिफिकेशन्सने हे स्पष्ट केले आहे की, रियलमीचा Realme 10T 5G लवकरच मार्केटमध्ये एन्ट्री करू शकतो. खास बाब म्हणजे Realme 10T 5G फोन Realme 9i 5G चे रिब्रँडेड व्हर्जन असू शकते.

Realme 10T 5G ला एनबीटीसी आणि बीआयएस सर्टिफिकेशन्स साइटवर Realme RMX3612 मॉडल नंबर सोबत लिस्ट करण्यात आले आहे. या लिस्टिंगमध्ये फोनचे नाव Realme 10T 5G वरून पडदा हटवला आहे. या मॉडल नंबर सोबत Realme 9i गेल्या वर्षी भारतात लाँच करण्यात आला होता. त्यामुळे हा फोन दुसरे व्हर्जन असू शकते, असे बोलले जात आहे.

Realme 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme 10T 5G स्मार्टफोन Realme 9i चे रिब्रँडेड व्हर्जन बनून मार्केटमध्ये येईल. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन एकसारखेच असतील. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या रियलमी ९ आय ५जी मध्ये 2408 x 1080 पिक्सल रिझॉल्यूशनचे ६.६ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले सोबत येईल. फोन स्क्रीन ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट व १८० हर्ट्ज टच स्मॅप्लिंग रेटवर काम करते. हा फोन २.४ गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडच्या मीडियाटेक डायमेंसिटी ८१० ऑक्टाकोर प्रोसेसर सपोर्ट करते.

वाचाः Jio आणि Airtel च्या टक्करमध्ये Vi चा बेस्ट प्लान, कमी किंमतीत महिनाभर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Realme 9i 5G ला अँड्रॉयड १२ आधारित यूआय ३.० वर काम करतो. ग्राफिक्ससाठी यात माली जी ५७ एसी२ जीपीयू दिला आहे. फोटोग्राफीसाठी रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये फ्रंट कॅमेरा म्हणून ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. Realme 9i 5G एक ड्युअल सिम फोन आहे. जो ४जी एलटीईवर काम करतो. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये १८ वॉट चार्जिंग टेक्नोलॉजी दिली आहे. ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गुगलचे Google Bard उतरले मैदानात, जाणून घ्या

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.