Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईपासून ते न्यूयॉर्कपर्यंत…; समुद्रात बुडणार शहरं, पृथ्वीवर प्रत्येक १० वा व्यक्ती धोक्यात…

7

नवी दिल्ली : जर तुम्ही राहत असलेली जागा काही वर्षांमध्ये समुद्रात समाविष्ट झाली तर? कदाचित ही गोष्ट तुम्ही हलक्यात घेत असाल किंवा याला काल्पनिक समजत असाल. पण हे खरंच होऊ शकतं आणि याचं कारण आहे क्लायमेट चेंज म्हणजेच हवामानातील बदल, समुद्राची पातळी वेगाने वाढणं हे जगासाठी मोठं संकट आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, किनार पट्टीवरील शहरांमध्ये राहणार्‍या ९०० दशलक्ष लोकांच्या जीवनावर याचा परिणाम होणार आहे.

हवामान संघटना WMO ने दिलेल्या अहवालामध्ये २०१३ ते २०२२ च्या दरम्यान समुद्राच्या पातळीमध्ये दरवर्षी सरासरी पाणी पातळी सर्वत्र सारखी नव्हती. काही भागांमध्ये जास्त तर काही भागांमध्ये कमी अशा पद्धतीने पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. या अहवालानुसार, ज्या वेगाने समुद्राची पातळी वाढते त्याचा लहान बेटांसाठी धोका आहे. इतकंच नाही तर भारत, चीन, नेदरलँड आणि बांगलादेश या देशांना याचा सगळ्यात मोठा धोका आहे. कारण, या देशांची अधिक लोकसंख्या ही किनारपट्टीच्या आसपास राहते.

या अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, शांघाय, ढाका, बँकॉक, जकार्ता, मापुटो, लागोस, कैरो, लंडन, कोपनहेगन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, ब्युनोस आयर्स आणि सॅंटियागो या शहरांना समुद्रची पातळी वाढल्यामुळे सर्वात मोठा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे या शहरांचं आर्थिक, सामाजिक आणि मानवी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नागरिकांना आताच या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

Monsoon 2023: यंदा देशावर आस्मानी संकट, शास्त्रज्ञांनी दिला मान्सून २०२३ चा अंदाज
यावर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस म्हणाले की, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे भविष्यात अनेक शहरं पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याचा फक्त हा एक एकच धोका नसून यामुळे आणखीही धोके निर्माण होती. यामुळे पाणी, अन्न, आरोग्य, सुविधा मिळण्यासाठी मोठा धोका तयार होईल. वाढत्या खारटपणामुळे सागरी जीवांचे जीवन धोक्यात आले आहे.

किती वेगाने वाढतेय समुद्राची पाणी पातळी…

अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे १९०० पासून समुद्राच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. या अहवालानुसार, १९९३ ते २००० च्या दरम्यान सरासरी पाणी पातळी दरवर्षी २.१ ने वाढली तर २००३ ते २०१२ च्या दरम्यान सरासरी पाण्याची पातळी वार्षिक २.९ मीमीने वाढली. अशात २०१३ ते २०२२ दरम्यान दरवर्षीची सरासरी ४.५ मीटरने वाढली आहे. तर येत्या २००० वर्षांमध्ये समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी सरासरी दोन ते तीन मीटरने वाढेल.

जर तापमान २ अंश सेल्सिअसने वाढलं तर समुद्राच्या पाण्याची पातळी २ ते ६ मीटरने वाढू शकतं आणि जर तापमानात ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली तर हीच पाण्याची पातळी १९ ते २२ मीटरने वाढण्याचा धोका आहे. जर हरितगृह वायूचे उत्सर्जन झालं तर २१०० पर्यंत समुद्र पातळी दोन मीटरने वाढेल आणि २३०० पर्यंत ती १५ मीटरने वाढेल अशी माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे.

पृथ्वीवर सगळ्यात जास्त सोनं सापडलं पण काढणं कठीण; हाती लागलं तर निघेल सोन्याचा धूर…

यामुळे काय आहे धोका…

WMO च्या अहवालानुसार, २० व्या शतकामध्ये ३००० वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढ्या वेगाने पाण्याची पातळी वाढली आहे. इतकंच नाही पहिल्यांदाच समुद्र इतका गरम झाल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे भविष्यात जर समुद्राची पातळी एवढ्या वेगाने वाढली तर तुम्ही राहत असलेलं शहर हे समुद्रात मिसळायला वेळ लागणार नाही.

भारतावर याचा काय परिणाम होणार?

समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे भारतालाही याचा धोका आहे. याचा सर्वात मोठा धोका मुंबईला असणार आहे. एका अहवालानुसार, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुंबई, कोची, मंगळूरू, चेन्नई विशाखापटनम, तिरुवनंतपुरमसह अनेक शहर २०५० पर्यंत पाण्याखाली जाऊ शकतात. समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याचा धोका भारतावर आहे. कारण, भारताला २५०० किमी लांबीचा किनारपट्टा आहे अंदमान निकोबार देखील भारतामध्ये आहे. अशात मोठ्या प्रमाणात खारफुटीची संख्या कमी झाल्यामुळेदेखील भारताला याचा मोठा धोका जाणवणार आहे.

समृद्धी महामार्गावर भरधाव कार थेट संरक्षण कठड्यावर चढली, ३० फूट खोल पडता-पडता…; पाहा VIDEO

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.