Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाशिवरात्री २०२३: शिवपूजनावेळी म्हणावयाचे श्लोक-मंत्र

10

माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी करण्यात येते. वास्तविक पाहता प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्र असते. मात्र, माघ महिन्यातील शिवरात्रीला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व असून, या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते. काही मान्यतांनुसार, या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती देवी यांचा विवाह झाला होता. या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणावर शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात. या दिवशी केलेली उपासना फळाला येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिवपूजनावेळी म्हणावयाचे श्लोक, मंत्र जाणून घेऊया…

शिवलीलामृत, शिवमहिम्न स्रोत्र, रुद्र या स्त्रोत्रांचे पठण शिवपूजनावेळी करावे.

पंचाक्षरी मंत्र

ॐ नमः शिवाय ॥

महाशिवरात्रीः ‘या’ आहेत शंकराच्या विविध आरत्या

शिवस्तुती

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ॥
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

महामृत्युंजय मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

महाशिवरात्रीः ‘ही’ आहेत पांडवकालीन शिवमंदिरे

द्वादश ज्योतिर्लिंग स्तुति

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्‌।
उज्जयिन्यां महाकालमोंकारं ममलेश्वरम्‌ ॥१॥

परल्यां वैजनाथं च डाकियन्यां भीमशंकरम्‌।
सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वारणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे।
हिमालये तु केदारं ध्रुष्णेशं च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः।
सप्तजन्मकृतं पापं स्मरेण विनश्यति ॥४॥

Mahashivratri Puja Vidhi महाशिवरात्रीला अशाप्रकारे करा पूजा, जाणून घ्या संपूर्ण विधी आणि कथा

शिव मानस पूजा

रत्नैः कल्पितमानसं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं।
नाना रत्न विभूषितम्‌ मृग मदामोदांकितम्‌ चंदनम॥
जाती चम्पक बिल्वपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा।
दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितम्‌ गृह्यताम्‌॥१॥

सौवर्णे नवरत्न खंडरचिते पात्र घृतं पायसं।
भक्ष्मं पंचविधं पयोदधि युतं रम्भाफलं पानकम्‌॥
शाका नाम युतं जलं रुचिकरं कर्पूर खंडौज्ज्वलं।
ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु॥२॥

छत्रं चामर योर्युगं व्यंजनकं चादर्शकं निर्मलं।
वीणा भेरि मृदंग काहलकला गीतं च नृत्यं तथा॥
साष्टांग प्रणतिः स्तुति-र्बहुविधा ह्येतत्समस्तं ममा।
संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो॥३॥

आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं।
पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः॥
संचारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो।
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्‌॥४॥

कर चरण कृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम्‌।
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करणाब्धे श्री महादेव शम्भो॥५॥

पूजा समाप्तीनंतर तीर्थ घेतानाचा मंत्र

अकाल मृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनम ।
शंकरपदोदकं तीर्थम् जठरे धारयाम्यहम् ॥

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.