Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

RTE प्रवेश प्रक्रिया कशी असते? कोणती कागदपत्रे लागतात? सर्वकाही जाणून घ्या

7

RTE Admission Details: तुम्ही टीव्हीवर ‘पढ़ेगा इंडिया, तभी तो बढ़ेगा इंडिया‘ ही स्लोगन ऐकली असेलच. स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या धोरणाबरोबरच भारत सरकारचा एक मोठा उद्देश्य शिक्षणाला प्रोत्साहन देणे व सर्व वर्गापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणे असा आहे. शिक्षणाचा अधिकार सर्व वर्गांना समान बनवण्यासाठी भारतीय राज्यघटनेत ‘शिक्षणाचा अधिकार’ (RTE) ला वेगळी जागा दिली गेली आहे. जेणेकरून देशातील कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये. त्याचबरोबर वास्तव स्थितीत अशी आहे की, माहितीच्या अभावी काही लोक या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाहीत.

आरटीई प्रवेश अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे –

-प्रवेशयोग्य मुलाच्या आई-वडिलांची सरकारी आयडी. जसे ड्राइविंग लाइसेंस, मतदान ओळख पत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्माचा दाखल किंवा पासपोर्ट.
-मुलाचे आयडी कार्ड.–पालकांनी मुलाचे कोणतेही सरकारी कागदपत्र सादर करावे.
-जात प्रमाणपत्र. जात प्रमाण पत्र आरटीई प्रवेशासाठी एक महत्वपूर्ण कागदपत्र आहे.
-उत्पन्नाचा दाखल. पालकांचा चालु वर्षातील महसूल विभागाने दिलेला उत्पन्नाचा दाखला.
-मुलाला जर विशेष वैद्यकीय सुविधेची गरज असेल तर तुम्हाला आरोग्य विभागाकडून उचित प्रमाण पत्र प्रदान केले जाईल.
-बेघर मुलं (street child) किंवा प्रवासी कामगारांच्या मुलांच्या प्रवेशासाठी एक प्रतिज्ञापत्र (affidavit) तयार करणे आवश्यक आहे. हे प्रतिज्ञापत्र कामगार विभाग, शिक्षण विभाग व महिला व बाल विकास विभागाकडून जारी केले जाईल.
-मुलाचा पासपोर्ट साइज फोटो.
-जर बालक अनाथ असेल तर माता-पिता दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.
-प्रवेशासाठी अंतिम तारखेच्या आधी सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल. आरटीई प्रवेशाची अंतिम तारीख सामान्यपणे प्रतिवर्ष एप्रिल महिन्याच्या दूसऱ्या किंवा अंतिम आठवड्यात असते.

आरटीई प्रवेश प्रक्रिया –

सर्वात आधी परिसरातील शाळेंची माहिती घ्या की कोणत्या शाळा आरटीई अंतर्गत येतात.
जर सरकारी शाळा तुमच्या घरापासून लांब आहेत तर जवळच्या खासगी शाळेंविषयी माहिती घ्या व जाणून घ्या की, तेथे आरटीई अंतर्गत राखीव कोटा आहे की नाही.
तुमच्या परिसरात आरटीई अंतर्गत शाळा असल्यास संबंधित शाळेतून आरटीई अर्ज घ्या.
एका मुलासाठी एकाच शाळेत आरटीई फॉर्म भरु शकतात.
तुम्हा ऑनलाइनही फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या.
त्यानंतर प्रिंट कॉपी आवश्यक कागदपत्रे जोडून शाळेत जमा करा.

आरटीईचा ऑनलाइन फॉर्म कसा भराल?

आरटीई फॉर्म ऑनलाइनही भरु शकतात. यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
शाळेची यादी माहिती झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत वेबसाइट rte25admission.maharashtra.gov.in वर जावे लागेल.
होमपेज वर अधिसूचना आरटीई २५% आरक्षण च्या खाली शाळेच्या यादीवर क्लिक करा.
आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा त्यानंतर ब्लॉकमधील शाळेच्या यादीवर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेची यादी व प्रवेश फॉर्म तुमच्या कम्प्युटर स्क्रिनवर दिसू लागेल.
हा फॉर्म राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर एका निर्धारित कालावधीमध्ये उपलब्ध असतो.
हा फॉर्म प्रत्येक वर्षी मर्यादित काळावधीसाठी वेबसाईट वर उपलब्ध असतो. मुदत संपल्यानंतर हा फॉर्म संकेतस्थळावर उपलब्ध नसतो.
फॉर्म भरताना पालकांना या गोष्टीची काळजी घ्यावी लागते की, फॉर्ममध्ये मुलाचे संपूर्ण नाव, ठिकाणाचे नाव, लिंग व अन्य माहिती अचून भरवी.
फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करुन फॉर्म सबमिट करा.
तुम्हाला ऑनलाइन फॉर्म राज्य सरकारच्या वेबसाइटवर मिळू शकतात. ती वेबसाईट आहे.
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

आरटीईचा निकाल (लॉटरी सिस्टम)

आरटीई अर्जाचा निकाल खासगी शाळेत मुलाच्या आई-वडिलांसमोर लॉटरी पद्धतीने काढला जातो. त्यानंतर प्रत्येक लॉटरी सिस्टमनंतर प्रवेश प्रक्रियेची तारीख निश्चित केली जाते. त्या तारखेला मुलाचा संबंधित शाळेत प्रवेश निश्चित होतो.

आरटीई महाराष्ट्र प्रवेश ऑनलाइन अर्ज नियमावली –

शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
आरटीई प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर एसएमएसद्वारा कळविण्यात येतो. परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील Application Wise Details (अर्जाची स्थिती ) या tab वर क्लिक करून प्रवेशाचा दिनांक पाहावा. प्रवेशाकरिता एसएमएसद्वारा सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.

पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे –
प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन
प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमांच्या द्वारे बालकाच्या
प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावले जाते.
विहित मुदतीनंतर प्रतिक्षा यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क ग्राह्य धरला जात नाही.
पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे. त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक असतो. लोकेशन आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जातो.
तसेच एकाच पालकांनी दोन अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जातो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.