Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हनी ट्रॅप करुन मॉडेल कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

8

पुणे,दि.३० :- पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला व्हॉटसअ‍ॅपद्वारे चॅटिंग करुन लैगिक भावना उत्तेजित करुन नग्न होण्यास भाग पाडून तो व्हिडिओ व्हाट्सअप व्हिडिओच्या माध्यमातून शूटिंग करून काढलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका ज्येष्ठ नागरिकाला ४ लाख ६६ हजार रुपयांना लुबाडल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ ते २५ मार्च दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना व्हॉटसअ‍ॅपवर कॉल आला.
त्यांच्याशी एका तरुणीने चॅटिंग व व्हिडिओ कॉल करुन त्यांच्या लैगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडिओ दाखविला.
त्यांना नग्न होण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा हा व्हिडिओ कॉल स्क्रीन रेकॉर्डिंग केला.
त्यानंतर त्यांना हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्या पैसे मागण्यास सुरुवात करण्यात आली.
त्यांनी पैसे दिल्यानंतर दुसर्‍यांनी पोलीस असल्याची बतावणी करुन हा व्हिडिओ युट्युबवरुन डिलिट करण्याचे
चार्जेस म्हणून त्यांच्याकडून ४ लाख ६६ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. चतुःश्रृंगी ठाण्यातील
पोलीस निरीक्षक चिंतामण तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.