Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​​स्मार्टफोनची बॅटरी लवकर खराब होण्यामागे ही पाच कारणं, ब्लास्ट होण्याचीही भिती

7

नवी दिल्ली: आजकाल सर्वच स्मार्टफोन ब्रँड्स आप-आपल्या फोनमध्ये फास्ट चार्जिंगची (Fast Charging) सुविधा देत आहेत. विशेष म्हणजे काही कंपन्या तर थेट 120W इतकं फास्ट चार्जिंग ऑफर देखील करतात. या दमदार फीचरच्या मदतीने आपला फोन अगदी १० मिनिटांत ६० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. पण अनेकजण आजकाल असाही दावा करत आहेत, की ओव्हरचार्जिंग आणि फास्ट चार्जिंगमुळे फोनची बॅटरी लवकर खराब होते. तसंच, या ओव्हरचार्जिंग, फास्ट चार्जिंगसह फोनचा अतिप्रमाणात वापर, वेगवेगळ्या फोन्सच्या वेगवेगळ्या चार्जरने फोन चार्ज करणं याशिवाय इतरही बऱ्याच कारणांमुळे फोनची बॅटरी लवकर खराब होऊ शकते. फोनची बॅटरी पूर्णपणे खराब झाल्यावर तर फोन सुरुच होणार नाही. पण याशिवाय फोनची बॅटरी खराब झाल्यावर ती ड्रेन होऊ लागते म्हणजेच चार्जिंग लवकर संपू लागते. तर ओव्हरचार्जिंग आणि फास्ट चार्जिंगमुळे फोनची बॅटरी लवकर खराब होते. तसंच, त्यामुळे ब्लास्टही होऊ शकतो. असे दावे केल जात असून या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? चला जाणून घेऊ…

​फास्ट चार्जिंगमुळे तोटा?

प्रत्येक फोन्सची बॅटरी चार्ज होताना ती एकप्रकारचं सायकल पूर्ण करते. म्हणजे एक फोन आधी ५० टक्क्यांपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा ५० ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो तेव्हा फोनच्या चार्जिंगची एक सायकल पूर्ण होते. दरम्यान आजवर असं दिसून आलं आहेकी ठराविक प्रमाणात या चार्जिंग सायकल पूर्ण झाल्यानंतर फोनची बॅटरी लवकर खराब होऊ लागते. पण असं असलं तरी फास्ट चार्जिंगमुळे फोनची बॅटरी खराब होते असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. तसंच ओव्हरचार्जमुळेही फोनच्या बॅटरीवर अधिक परिणाम होतात, असंही समोर आलेलं नाही. कारण आजकालचे स्मार्टफोन पूर्ण चार्ज केल्यानंतर चार्जिंग आपोआप बंद होते

​वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

​फास्ट चार्जिंगमुळे फोनमध्ये स्फोट?

​फास्ट चार्जिंगमुळे फोनमध्ये स्फोट?

फास्ट चार्जिंगची सुविधा असणारे फोन अशाप्रकारे बनवले जातात. ज्यामुळे त्यांमध्ये अनेक प्रकारचे लेयर प्रोटेक्शन देण्यात आलेले असतात. त्यामुळेच फास्ट चार्जिंगमुळे फोनमध्ये ब्लास्ट होत नाही. जलद चार्जिंग दरम्यान बॅटरीला उष्णतेपासून वाचवण्यासाठी ड्युअल सेल दिलेला आहे. तसचं वेगवान चार्जिंगसाठी वेगळे सर्किट दिले आहे.

​​वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

काय आहेत स्फोटाची कारणे?

काय आहेत स्फोटाची कारणे?

तर तज्ज्ञांच्या मते, फोनमध्ये स्फोट होण्याचे कारण सामान्यतः मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असते. प्रोडक्ट तयार करतानाच्या काही चूकां झाल्या तर बॅटरीतील लिथियम आयन बॅटरी अनेक वेळा हवेच्या संपर्कात येते. अशा स्थितीत फोनमध्ये स्फोट होण्याची शक्यता वाढते.

​​वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

​फोनवर हाय प्रेशरही धोक्याचं​

​फोनवर हाय प्रेशरही धोक्याचं​

कोणत्याही फोनवर अतिरिक्त दबाव टाकू नये. तर फोनवर अतिरिक्त दबाव म्हणजे त्याचा अतिवापर तसंच फिजीकल दबावही फोनसाठी हानिकारक असतो. कारण फोन अधिककाळ खिशात ठेवल्याने त्यावर अधिक प्रेशर येतं. ज्यामुळे स्मार्ट फोनची बॅटरी खराब होऊ शकते.

​वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स

​वेगळा चार्जरने फोन चार्ज करणं

​वेगळा चार्जरने फोन चार्ज करणं

आपला फोन कधीच वेगवेगळ्या चार्जरने चार्ज करू नये. कारण कंपनी फोन तयार करताना प्रत्येक फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो की नाही हे नक्की नसतं. तसंच किती वॅटवर चार्ज होतो हे देखील माहित नसल्याने फोनची बॅटरी लवकरच खराब होऊ शकते.

​वाचाः मस्तच! अँड्रॉईडमध्ये येणार आयफोनसारखा फील, Whatsapp मध्ये होतोय हा मोठा बदल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.