Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​Smartphone वापरताना ‘या’ ५ नियमांचं करा पालन, नाहीतर जावं लागू शकतं जेलमध्ये

12

Smartphone Use Care : आजच्या काळात फोनचा खासकरुन स्मार्टफोन्सचा वापर हा अगदीच सर्रास झाला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण स्मार्टफोनचा वापर करतात. पण हे फोन्स वापरतानाही काळजी घेणं अगदी गरजेचं आहे. कारण आपण सर्वचजण स्मार्टफोन वापरत असू तरी या स्मार्टफोनच्या वापराविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी या माहिती नसतात. त्यामुळे फोनच्या वापराबद्दल नेमके नियम माहित नसल्यामुळे आपण आपल्याच फोनमुळे खूप अडचणीत देखील येऊ शकतो. तर अशा परिस्थितीत फोनच्या वापराबाबत काही मूलभूत गोष्टींची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपण ही काळजी न घेतल्यास आणि नियमांचं पालन न केल्यास आपल्याला थेट जेलमध्ये देखील जावं लागू शकतं. चला तर फोनच्या वापरांबद्दलच्या नियमांविषयी सविस्तर जाणून घेऊ..

फोनवरुन चूकीच्या भाषेत बोलणं धोक्याचं

आपण दिवसभरात कितीतरी व्यक्तींशी फोनवरुन बोलत असतो. अनेकदा अनोळखी व्यक्तींशीही बोलतो. पण या साऱ्यांशी बोलतना काळजी घेणं गरजेचं आहे.
फोनवर बोलताना कोणालाही शिवीगाळ करू नये. तसेच जीवे मारण्याची धमकी देणंही गुन्हा आहे. कारण फोनवरील संभाषनाचा पुरावा म्हणून वापर करता येतो. कोणी पोलिसात तक्रार केल्यास तुरुंगात जावे लागू शकते. तसेच मेसेज करूनही कोणालाही धमकावू नये.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

सोशल मीडियाचा जपून वापर

सोशल मीडियाचा जपून वापर

फोनवर सर्फिंग करताना तसंच एखादी गोष्ट शोधतानाही काळजी घेतली पाहिजे. कारण काही गोष्टींवर सरकारने बंदी घातली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या देशात एखाद्या चित्रपटावर बंदी घातली गेली आणि तुम्ही त्या सिनेमाच्या लिंकवर प्रवेश केला तर तो गुन्हा मानला जातो. अशा स्थितीत त्या देशात काय कायदा आहे हे कळायला हवी. उदाहरणार्थ, भारतात बलात्कार पीडितेचे नाव उघड करणे गुन्हा आहे. अशा परिस्थितीत बलात्कार पीडितेचे नाव सोशल मीडियावर टाकू नये.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं

दंगल भडकवणे

दंगल भडकवणे

दंगल भडकवण्यासाठी सोशल मीडिया किंवा कोणत्याही फोनचा वापर करू नये. आता दंगल भडकावणं म्हणजे, जाती-धर्माविषयी चितावणीखोर वक्तव्य तुम्ही फोन करून किंवा सोशल मीडियावर पोस्ट करून दंगल भडकावली तर तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो. हा गुन्हा इतका गंभीर असतो की तुम्हाला यामुळे थेट तुरुंगात जावे लागू शकते. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यामध्ये तुम्हाला लवकर जामीनही मिळत नाही.

​​वाचाः१६ हजारांचा फोन मिळतोय ६५० रुपयांना, POCO M4 5G वर बंपर डिस्काउंट

फोनद्वारे विनयभंग किंवा गैरवर्तन

फोनद्वारे विनयभंग किंवा गैरवर्तन

तर फोनवरुन कोणाच्याही परवानगीशिवाय फोटो काढून सोशल मीडियावर टाकणे हा देखील गुन्हा आहे. असे केल्यास तुरुंगात थेट जावं लागू शकतं. तसंच, तुम्ही सोशल मीडियावरून कोणाला घाणेरडे मेसेज किंवा अश्लील मेसेज पाठवल्यास, त्या प्रकरणातही तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. फोनवर बोलतान किंवा मेसेजवरुन चुकीचं गैरवर्तन केल्यास त्यालाही विनयभंग मानला जाऊन तुम्हाला तशी कडक शिक्षा होऊ शकते.

​वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

​कॉपी राइटबद्दलही रहावं सतर्क

​कॉपी राइटबद्दलही रहावं सतर्क

कोणत्याही प्रकारची कला तसंच सिनेमा, गाणी किंवा एखादं अॅपची कॉपी करू नये. जर तुम्ही मूळ अॅप, पुस्तक, चित्रपट आणि कला तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी परवानगीशिवाय वापरत असाल तर तुमच्यावर कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा दाखल झाल्यास देखील तुम्हाला थेट तुरुंगात जावे लागू शकते.

​वाचाःAsus ने लाँच केले ८ नवे लॅपटॉप, प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी खास, पाहा संपूर्ण यादी सविस्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.