Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पगारावरून वाद, जाणून घ्या त्यांची सॅलरी

5

नवी दिल्लीःगुगल जगातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे. परंतु, या वर्षी गुगलने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नारळ देत घरी बसवले आहे. गुगल कंपनीच्या खर्चावर कंट्रोल ठेवण्यासाठी गुगलच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात आणि सुविधेत कपात सुद्धा करण्यात आली आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, वाढती महागाई आणि कंपनीचे प्रॉफिट पाहून हा निर्णय घेतला आहे. परंतु, आता गुगलच्या या दाव्यावर लोकांना विश्वास राहिला नाही. याचे कारण ठरले आहे सुंदर पिचाई यांची सॅलरी.खरं म्हणजे गुगलने एकीकडे कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. परंतु, कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पगारात वाढ केली आहे. यूएस सिक्योरिटीज आणि एक्सचेंज कमिशन म्हणजेच SEC च्या रिपोर्टनुसार, पिचाई यांच्या वेतन पॅकेजमध्ये २१८ मिलियन डॉलरच्या स्टॉकचा समावेश होता.

वाचाःचीन टाकणार आता ‘पुढचं पाऊल’, या निर्णयाने अमेरिकेला भरली धडकी, पाहा डिटेल्स

सॅलरीत स्टॉकच्या किंमतीचा समावेश
सुंदर पिचाई यांचे वेत गेल्या तीन वर्षापासून २ मिलियन डॉलर बनले होते. परंतु, पिचाई यांना २१८ मिलियन डॉलरचे ३ वर्षासाठी स्टॉक मिळाले आहे. पिचाई यांचे वेतन आधी ६.३ मिलियन डॉलर होते. परंतु, त्यावेळी त्यांच्या सॅलरीत स्टॉकच्या किंमतीचा समावेश नव्हता. पिचाई यांचे पॅकेज कंपनीच्या अन्य एक्झिक्यूटिव्हपेक्षा जास्त आहे.

वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

कूक यांनी पगारात कपात केली
२०२३ मध्ये टिम कूक यांनी आपल्या पगारात कपात केली आहे. गेल्या दोन वर्षासाठी ते १०० मिलियन डॉलर वेतन घेत होते. यावरून त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली होती. टिक कूक प्रमाणे सुंदर पिचाई यांची सुद्धा सॅलरीवरून टिका केली जात आहे.

वाचाःChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.