Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

(कोंढवा पोलिस स्टेशनची कामगिरी) विद्यार्थ्यांकडून अधिक रक्कम,पश्चिम ट्रस्टमधील गडबड पैसे घेऊन परस्पर हडप केली 50 लाखांहून महाराष्ट्र एज्युकेशन घोटाळा, 8 जणांवर गुन्हा

93

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

पुणे कोंढवा :- पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थेच्या खात्यात जमा न करता ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर रशिद खान (वय ४४, रा. नाना पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५२८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तबस्सुम अन्वर शेख (वय ४८), अन्वर नजीमुल्ला शेख (वय ५५, दोघे रा. कॅम्प), तरन्नुम कादर सय्यद (वय ४३), कादर छोटेमिया सय्यद (वय ५२, रा. लोणावळा), नाजेमा साहेल खान (वय ४२), सोहेल इस्माईल खान (वय ४८, रा. अम्मार सोसायटी, कोंढवा), असिन आरीक शेख (वय ३७), आरीफ शेख (वय ४०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील मिठानगरमधील महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेत २०१८ पासून आतापर्यंत झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ट्रस्ट व त्या अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे कागदपत्रावर आरोपींनी खोट्या सह्या केल्या. विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थेच्या खात्यावर जमा न करता ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार करुन शासनाची व संस्थेची फसवणूक केली.

आरोपींनी फिर्यादी व फिर्यादीचे आईच्या नावाने बनावट व करुन संस्थेचे लेटरहेड वापरुन जव्वाद या शिक्षकाची अनुदानित पदावर नेमणूक केली आहे. नामा साहेल

खान या सतत आजारी असून गैरहजर असताना ही शाळेच्या

मस्टरवर एकत्रित सही करुन शासनाची फसवणूक केली असल्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.