Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांचे OPSU-1 सत्र पोलीस हवालदार इकबाल शेख

30

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांचे OPSU-1 सत्र क्र. 15 हे दिनांक 08/05/2023 ते 20/05/2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षणार्थी यांना सीसीटीएनएस प्रणाली तसेच केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आयसीजेएस सर्च पोर्टल व इतर महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन/व्याख्यान देणे करिता पोलीस हवालदार इकबाल शेख सोलापूर ग्रामीण यांना आमंत्रित करण्यात आले होते.

सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांना सीसीटीएनएस प्रणाली, पोलीस रेकॉर्ड वरून गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेणे व गुन्हे प्रकटीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अद्यावत माहिती उपलब्ध करून घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल

प्राचार्य मा. श्री. मकानदार सर, उप-प्राचार्य मा. श्री. पाटील सर , समन्वयक अधिकारी पो.नि. श्री. चंद्रकांत जाधव सर पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा यांनी पोलीस हवालदार इकबाल शेख सोलापूर ग्रामीण यांचे पुष्परोप देऊन स्वागत सत्कार केलं आहे.

मा. प्राचार्य व सर्व समन्वयक अधिकारी व प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार.

पोलीस हवालदार
इकबाल शेख
सोलापूर ग्रामीण

Leave A Reply

Your email address will not be published.