Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई: सरस्वतीचा संपूर्ण मृतदेह नाही मिळाला,बहिणीच करणार तुकड्यांचे अंत्यसंस्कार

11

मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांडाचा तपास वेगाने सुरू आहे. मात्र, आरोपी मनोज साने वारंवार साक्ष फिरवत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे 100हून अधिक तुकडे केले. वेगवेगळ्या ठिकाणी या तुकड्यांची विल्हेवाट लावली. सोसायटीच्या मागच्या नाल्यातही त्याने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे फेकले होते. पोलिसांनी या संपूर्ण नाल्यात सर्च ऑपरेशन केले. पण पोलिसांच्या हाती फार काही लागलं नाही. घरातून जेवढे तुकडे मिळाले, त्या व्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच लागलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, आता जेवढे तुकडे आहेत, तेवढ्यांवरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरस्वतीच्या बहिणी अंत्यसंस्कार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.