Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Youtube वर ५०० सब्सक्रायबर्स असणारेही पैसा कमावू शकणार, युट्यूबच्या नियमांत बदल

7

नवी दिल्ली :Youtube Changes Monetization Rule : YouTube हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे अगदी हवा तो प्रत्येकजण व्हिडीओ अपलोड करु शकतो.दरम्यान काही प्रसिद्ध चॅनेल्सचे सब्सक्रायबर्स म्हणजेच फॉलोवर्स खूप असतात तर काही नवख्या चॅनेल्सला अधिक फॉलोवर्स नसतात. दरम्यान अशाच कमी सब्सक्रायबर्स असणाऱ्या चॅनेल्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यूट्यूबने आपल्या नियमांत केलेल्या बदलांमुळे या चॅनेल्सला फायदा होणार आहे.

तर मागील काही काळात YouTube हे कमाईचे नवीन साधन बनले आहे. अनेक लोक त्यांच्या नोकऱ्या सोडून त्यांचे YouTube चॅनल चालवत आहेत. मात्र, तुमचे यूट्यूब सबस्क्राइबर्स कमी असतील तर तुम्ही पैसे कमावू शकणं अवघड होतं. पण हा धोका कमी करण्यासाठी यूट्यूबने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार तुमचे युट्युबवर कमी सबस्क्राइबर्स असले तरीही तुम्ही YouTube वरून कमाई करू शकाल.

YouTube बदलले नियम
तर यूट्यूब आपले नियम बदलणार आहे. त्यानंतर, कमी सदस्य असूनही, तुम्ही कमाई करू शकाल. तुमचे YouTube वर ५०० किंवा १००० सब्सक्रायबर्स असल्यास देखील तुम्ही तुमच्या खात्यावर कमाई करू शकाल. YouTube पार्टनर प्रोग्रामसाठी आवश्यक असलेले नियम कमी करणार असल्याची घोषणा YouTube ने केली आहे. यामुळे कमी सब्सक्रायबर्स कमी असलेले युजर्सही कमाई करण्यास सक्षम असतील. यापूर्वी, युजर्सना अधिक सब्सक्रायबर्स असल्यावर कमाई करता येत होती. पण आता YouTube च्या नवीन धोरणानुसार, कमाई करण्यासाठी किमान ५०० सब्सक्रायबर्स असले पाहिजेत, जे आधीच्या तुलनेत कमी आहेत. तसेच, व्हिडीओ वॉच टाईमही आता कमी करण्यात आला आहे.

शॉर्ट व्हिडिओंसाठी देखील बदललेले नियम
तर शॉर्टचे व्ह्यूज १० मिलियनवरुन ३ मिलियन झाले आहेत. हे बदल प्रथम यूएस, यूके, युनायटेड किंगडम, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये लागू केले जातील. मात्र, भारतात या बदलाला वेळ लागू शकतो. मात्र हा बदल भारतातही लागू होणार हे निश्चित.

वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.