Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

परदेशी शिक्षणाचे पर्याय अनेक; तुमचा परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी परिपूर्ण माहिती

25

भारतातील अनेक विद्यार्थीं आज परदेशात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जाण्याची स्वप्न पाहतात. पण त्यासाठी त्यासाठीचा मोठा खर्च, कुटुंबाला सोडून अनोळखी देशात, अनोळखी वातावरणात राहणे, यासगळ्याशी जुळवून घेऊन भरपूर अभ्यास करून यश मिळवायचे, हे कठीण वाटले, तरी आपल्याकडील लाखो विद्यार्थी आज परदेशात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी जातात.

परदेशात शिक्षण घेण्यामागची काही प्रमुख कारणे :

– जगातील सर्वोत्तम विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न
– विविध क्षेत्रांचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम
– आंतराष्ट्रीय संस्कृतीचा अनुभव
– परदेशातील उच्चशिक्षित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी
– भरपूर संख्येने उपलब्ध कोर्सेसमधून आपल्या मनाप्रमाणे शाखा आणि विजशय निवडण्याची संधी

युके, ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए), कॅनडा, सिंगापूर, युरोपमधील शिक्षणाला जागतिक स्तरावर अनेक संधी मिळत आहेत. त्यामुळे या देशांमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय. परदेशात जाऊन शिक्षण घेणे हा तुमच्यासाठी छान आणि तुम्हाला परिपूर्ण करणारा अनुभव असतो. पूर्णतः वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या संस्कृतीत आणि वातावरणात तुम्ही घडत असता. स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतोच, पण त्याचबरोबर करिअरचेही योग्य नियोजन करणे शक्य होते.

(वाचा : Rajasthan Public Service Commission Recruitment: राजस्थान लोकसेवा आयोगाची तब्बल ९०५ जागांच्या भरतीची घोषणा)

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (युएसए) :

दर्जेदार शिक्षण, शिक्षणपद्धती, फ्लेक्सिबिलिटी, अभ्यासक्रमातील वैविध्य आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्तम बनवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, अशा अनेक कारणांमुळे अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी देशा-विदेशातून विद्यार्थी येत असतात. अमेरिकेत अनेक सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमधून विविध क्षेत्रांचे शिक्षण देणारे भरपूर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

सामान्यतः या देशात पदवी (बॅचलर), पदव्युत्तर (मास्टर्स) आणि डॉक्टरेट डिग्री प्रोग्रॅम उपलब्ध आहेत. काही कॉलेजांमध्ये असोसिएट डिग्री किंवा व्होकेशनल आणि टेक्निकल ट्रेनिंग देणारे कोर्सेस आहेत. येथील विद्यापीठांमधील बॅचलर डिग्री कोर्सेस (बारावीनंतर) चार वर्षे कालावधीचे असतात.

यूएसएमधील बहुसंख्य कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी औपचारिक शिक्षणाची (फॉर्मल एज्युकेशन) १२ वर्षे पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.

(वाचा : New Medical Colleges in Maharashtra: राज्यात नव्या नऊ मेडिकल कॉलेजांची सुरुवात; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा)

युके :

आपली गरज आणि क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे एकत्रीकरण करवून आपले शिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण करू शकतात. युकेमध्ये स्पेशलायझेशनसाठी अनेक पर्याय आहेत. युकेमधील अभ्यासक्रम कमी कालावधीत पूर्ण होणारे पण, सखोल असतात.

यूकेमध्ये पदवी अभ्यासक्रम तीन वर्ष कालावधीची आहे. इतर देशांमध्ये हाच अभ्यासक्रम चार किंवा दोन वर्ष कालावधीचा आहे. याचाच अर्थ यूकेमध्ये हा अभ्यासक्रम करून तुम्ही वेळेची बचत तर करताच, शिवाय राहण्या-खाण्यापिण्याचा खर्च आणि अभ्यासक्रमाच्या फीचा खर्चहीही वाचवता.

येथील अभ्यासक्रम अधिक प्रभावी (इंटेन्सिव्ह) असल्यामुळे वेळ आणि पैशाच्या बाबतीत अधिक कार्यक्षम असतात. यूकेमध्ये अभ्यासक्रम करताना एखादा विद्यार्थी अगदी कम्प्युटर गेम्स इंजिनीअरिंग ते मल्टी मीडिया डिझाइन, अँथ्रोपलॉजी, क्रॉस कल्चरल सायकोलॉजी, हॉटेल रनेजमेंट किंवा नृत्य विषयात स्पेशलायझेशन करू शकतात.

(वाचा : Online Career Opportunities: वर्क फ्रॉम होमसाठी ‘व्हर्चुअल वर्ल्ड’ मधील पर्याय, कोणत्या क्षेत्रात मिळवाल संधी)

ऑस्ट्रेलिया :

ऑस्ट्रेलियात शिक्षण घेणे, हा विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा अनुभव असतो. ऑस्ट्रेलियन शिक्षण पद्धतीला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मान्यता आहे. प्रभावी रचना आणि नाविन्यपूर्ण धोरण अशी ऑस्ट्रेलियन शिक्षणाची ख्याती आहे. ऑस्ट्रेलियात डिग्री कोर्स पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात. या कोर्सचा कालावधी कमी असून त्यासाठी खर्चही कमी होतो.

ऑस्ट्रेलियातील बहुतेक कॉलेज आणि सर्व युनिव्हर्सिटीजमधून बीएस, बीई, बीए यासारखे अंडरग्रॅज्युएट कोर्स करण्यासाठी औपचारिक शिक्षणाची किमान १२ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. आपल्या भारतीयांच्या भाषेत बारावीची परीक्षा किंवा ज्युनिअर कॉलेज (अटी आणि नियमांप्रमाणे) तसेच अगदी डिप्लोमा पास असणे आवश्यक ठरते.

(वाचा : Before Confirming Your Admission: कोणत्याही विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यापूर्वी हे नक्की तपासा)

सिंगापूर :

गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सिंगापूर हे सर्वात मोठे डेस्टिनेशन बनत आहे. जगाच्या नकाशावर सिंगापूरचे मोक्याचे स्थान, हायटेक सोयीसुविधा, सांस्कृतिक विभिन्नता आणि आकर्षक पर्यटन स्थळे यामुळे गेल्या काही वर्षांत व्यवसायासाठी आणि मनोरंजनासाठी सिंगापूरमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सिंगापूरमधील विद्यापीठात या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी टोफेल किंवा आयईएलटीएस (इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी) परीक्षा देणे आवश्यक ठरते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.