Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Mumbai)
जगातील सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेजांच्या यादीत आयआयटी-मुंबईची गणना केली जाते. तंत्र विश्वातील मानाचे स्थान असलेल्या या संस्थेचे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. तर, इथले प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधन यांमुळे इथल्या अभ्याक्रमांची चर्चा सर्वत्र असते. यंदाही देशातील १० जेईई टॉपर्सनीही आयआयटी मुंबईची निवड केली आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई (ICT, Mumbai)
आयसीटी ची स्थापना १ ऑक्टोबर १९३३ रोजी तत्कालीन कुलगुरू सर विठ्ठल एन. चंदावरकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या रसायन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ विभाग (UDCT) म्हणून केली होती. देशातील रासायनिक अभियांत्रिकी, रासायनिक तंत्रज्ञान आणि फार्मसी क्षेत्रातील प्रशिक्षण आणि संशोधनावर लक्ष केंद्रितकरणारी ही एक अग्रगण्य संस्था आहे.
विश्वेश्वरैया नॅशनल टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, नागपूर (VNIT, Nagpur)
एनआयआरएफ म्हणजेच National Institute Ranking Framework च्या यादीनुसार हे ३० व्या क्रमांकाचे कॉलेज आहे. १९६० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या व्हीएनआयटी १३ हून अधिक शाखांमधील आणि विविध पातळीवरील कोर्सेस उपलब्ध आहेत.
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP, Pune)
सीओईपी हे भारतातील जुन्या आणि नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजांमधील एक महत्त्वाचे नाव. भारतातील मॅकेनिकल इंजिनिअरिंगची सगळ्यात पहिली सुरुवात करणार हे कॉलेज आजही अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आजही इथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळते.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (AIT, Pune)
एनआयआरएफच्या रँकिंग नुसार ९१ व्या, म्हणजेच सर्वोत्तम आणि नामांकित १०० पैकी एक असणार हे एक महत्त्वाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. हे कॉलेज पुणे विश्वविद्यालय यांच्या अंतर्गत चालविले जाते.
भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (Bharati Vidyapeeth, Pune)
भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना १९८३ मध्ये करण्यात आली होती तेव्हापासून भारती विद्यापीठ हे नाव तंत्रविश्वातील शिक्षणासाठी आवर्जून घेतले जाणारे नाव आहे. आजही इथे अनेक विषयांमधील कोर्सेस उपलब्ध असून, त्याची मागणी वाढत आहे.
वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, मुंबई (VJTI, Mumbai)
या संस्थेची सुरुवात विक्टोरीया ज्युबली टेक्निकल इन्स्टिट्यूट या नावाने करण्यात १८८७ मध्ये करण्यात आली होती. पुढे १९९७ मध्ये त्याचे नाव बदलून वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट असे ठेवण्यात आले. आजही व्हीजेटीआय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी आतोनात प्रयत्न करतात.