Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Refrigerator Tips : पावसाळ्यात ‘या’ चुका केल्यातर तुमचा रेफ्रिजरेटर होईल खराब, फॉलो करा सोप्या स्टेप्स

9

फ्रीजची योग्य जागा निवडा

पावसाळ्यात फ्रीजला उष्णता आणि आर्द्रतेपासून वाचवण्यासाठी, फ्रीजची जागा निवडताना तुम्ही योग्य जागा निवडली पाहिजे. कारण जास्त उष्णता किंवा आद्रतेमुळे फ्रीज खराब होऊ शकतो. त्यामुळे पावसापासून फ्रीजला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फ्रीजसाठी सर्वोत्तम जागा एअर व्हेंट, चांगली हवा खेळती असणारी खोली असू शकते.

​फ्रीजच्या मागील बाजूचा वापर करा

​फ्रीजच्या मागील बाजूचा वापर करा

फ्रीजच्या मागे तयार होणारी उष्णता कमी करण्यासाठी, फ्रीजच्या मागे असलेल्या रिकाम्या जागेत वेंटिलेशन सिस्टम तयार करण्यासाठी तुम्ही लहान पाईप वापरू शकता. हे तापमान नियंत्रित करण्यात मदत करेल आणि फ्रीज थंड होण्यास मदत करेल.

वाचा : आता गावा-गावातही सुपरफास्ट इंटरनेट, 6G आणण्यासाठी भारत सरकार सज्ज​

​फ्रीज नियमित साफ करा

​फ्रीज नियमित साफ करा

फ्रीजची नियमित साफसफाई करणे खूप गरजेचे आहे. हे केवळ फ्रीजमधील अन्न चांगलं ठेवण्यास मदत करेल, असं नाही तर कूलिंग देखील चांगली ठेवेल. फ्रिजचा दरवाजा वारंवार उघडल्याने देखील फ्रीजची कूलिंग खराब होते आणि फ्रीजचे तापमान वाढू शकते, त्यामुळे फ्रीजचे सर्व दरवाजे बंद असल्याचं तपासून घ्या.

​वाचा : Google Doodle ने पाणीपुरीवर बनवले मजेदार डुडल, पाहूनच सुटेल तोंडाला पाणी, युजर्ससाठी आणला खास ‘Pani Puri’ गेम

​फ्रीजमध्ये वस्तू नीट ठेवा

​फ्रीजमध्ये वस्तू नीट ठेवा

फ्रीजमध्ये वस्तू व्यवस्थित ठेवल्याने त्याची कूलिंग अधिक वाढते. जास्त प्रमाणात भरलेल्या फ्रीज रूममुळे कूलिंग कमी होऊ शकते, म्हणून ती वाढवण्यासाठी गरजेचे नसलेले पदार्थ काढून टाका. यामुळे फ्रीजची कूलिंग वाढेल.

वाचा : Flipkart Big Saving Days Sale ती तारीख आली समोर, iPhone 14 सह Android फोन्सवरही बंपर डिस्काउंट ऑफर

​फ्रीजचा योग्य वापर करा

​फ्रीजचा योग्य वापर करा

फ्रीजमधून निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा फ्रीज जास्त भरणे टाळले पाहिजे. तसेच, रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघडताना आणि बंद करताना तो हळूवारपणे करा. कारण जोरात फ्रीज डोअर आपटल्याने फ्रीज लवकर खराब होऊ शकतो. तसंच कूलिंगही कमी होते.

वाचा : रात्रभर फोन वापरत बसता, झोप लागत नाही? तुमच्या स्मार्टफोनमध्ये आजच बदला ‘या’ सेटिंग्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.