Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​Smartphone Care : स्मार्टफोनचा चार्जर होणार नाही खराब, फक्त चुकूनही ‘या’ चुका करू नका

12

ओलाव्यापासून चार्जर दूर ठेवा

चार्जर नेहमी आर्द्रता आणि ओलाव्यापासून दूर ठेवावा. कारण चार्जर पाण्याजवळ ठेवणं फार हानिकारक ठरू शकतं. कारण पाण्यामुळे कोणतंही उपकरण खराब होतं. तसंच, एकदा चार्जर खराब झाला की चार्जिंगचा वेगही बराच कमी होतो. म्हणूनच तुम्ही नेहमी चार्जरची काळजी घेतली पाहिजे. अनेक वेळा चार्जरमध्येही पाणी जाते, जे त्याच्यासाठी खूप हानिकारक ठरते.

​सतत चार्जिंगचा वापर

​सतत चार्जिंगचा वापर

अनेक वेळा असे दिसून येते की चार्जरची गरज नसतानाही अनेकजण सतत चार्जर चालूच ठेवतात. पण आपण हे करणं नेहमीच टाळले पाहिजे. कारण सतत चार्जरचा वापर चार्जर खराब करण्यास कारणीभूत ठरु शकतो. यामुळेच स्मार्टफोन चार्ज होताच चार्जिंगमधून काढून टाकावे.

चार्जर तापूनही खराब होऊ शकतो

चार्जर तापूनही खराब होऊ शकतो

चार्जरला देखील उष्णतेपासून संरक्षित केलं पाहिजे. कारण चार्जर खूप तापत असेल तर चार्जर खराब होईलच सोबतच यामुळे स्मार्टफोन देखील खराब होतो. चार्जरमध्ये गरम होण्याची समस्या देखील आहे. तुम्ही चार्जरबाबत सावध राहून तो रिपेअर करायला हवा किंवा बदलायला हवा.

​वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

फोनचा ओरिजनल चार्जरच वापरा

फोनचा ओरिजनल चार्जरच वापरा

प्रत्येक फोन किंवा मॉडेलचा एक विशिष्ट चार्जर असतो. त्यामुळे त्या त्या फोनचा चार्जर त्या त्या फोनला वापरायला हवा. कारण एका फोनचा चार्जर दुसऱ्या फोनला वापरल्यास चार्जर आणि परिणामी फोन खराब होऊ शकतो. अनेकदा जास्त वॅटचा चार्जर कमी वॅट सपोर्टेड असणाऱ्या फोनला वापरल्यास फोन आणि चार्जर खराब होऊ शकतो.

वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?

​चार्जर योग्यरित्या ठेवा

​चार्जर योग्यरित्या ठेवा

चार्जर खासकरुन चार्जरची वायर फारच नाजूक असते. त्यामुळे चार्जिंगला लावताना किंवा घरात ठेवताना तसंच कुठेही कॅरी करताना चार्जर योग्यरित्या ठेवलेला असेल याची खात्री करा. कारण चार्जरची वायर बेंड होऊन कधीही तुटू शकते, त्यामुळे चार्जर योग्यरित्या ठेवा.

वाचा : Gpay वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता पिन न टाकता ही करता येणार UPI पेमेंट​

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.