Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी दोन दिवसात धुमाकूळ.
- संभाजीनकगर, रूईकर कॉलनीसह अनेक ठिकाणी बंद घरांमध्ये घरफोड्या.
- चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने एलईडी टीव्ही आणि रोख रक्कम असे बरेच साहित्य चोरून नेले.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी दोन दिवसात धुमाकूळ घालत चांगलाच डल्ला मारला. संभाजीनकगर, रूईकर कॉलनीसह अनेक ठिकाणी बंद घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी केलेल्या घरफोडीमुळे खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने एलईडी टीव्ही आणि रोख रक्कम असे बरेच साहित्य चोरून नेले. (An increase in thefts in Kolhapur has created an atmosphere of concern)
कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील ओम गणेश कॉलनीत नवनीत काशीद हे कुटूंबियांसोबत राहतात. त्यांचे दोन मजली घर आहे. खालच्या मजल्याला कूलूप लावून कुटूंबिय वरच्या मजल्यावर झोपले होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तळमजल्यावरील हॉलचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, चांदीच्या वस्तू आणि ५ हजाराची रोकड असा सुमारे लाखांचा ऐवज चोरून नेला. याच कॉलनीतील नामदेव खटावकर, रावसाहेब पाटील यांच्या घरातही त्यांनी चोरी केली. त्यानंतर स्वाती रेसिडेन्सीमधील बंद बंगला चोरट्यांनी फोडला.
क्लिक करा आणि वाचा- चिंतेत वाढ; राज्यात करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वाढली; मात्र ‘हा’ दिलासाही!
रुईकर कॉलनी येथील युनिक पार्कातही चोरट्यांनी चोरी केली. नागाळा पार्क येथील चंदवाणी सिरॅमिक गोडावूनला पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी लक्ष्य केलं. गोडावूनच्या शटरच कुलूप उचकटून त्यातील किंमती साहित्य चोरून नेले. बंद घर आणि दुकानांना लक्ष्य करत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शाहुपूरी व जुना राजवाडा पोलिस अधिक तपास करत आहेत. काही चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाले आहेत. त्यामुळे पोलिस त्याचा आधार घेत अधिक तपास करत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवासाठी महापालिकेची नवी नियमावली; पाहा, काय आहेत नियम!
क्लिक करा आणि वाचा- महाराष्ट्रातून ४० मंत्री केले तरी शिवसेना संपणे अशक्य: उदय सामंत