Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२४ मधील बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणारा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित विषयांचे नमुना पेपर (सँपल पेपर) सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर (cbseacademic.nic.in) प्रसिद्ध केले आहेत. शिवाय, यात परीक्षेची मार्किंग स्कीम, परीक्षेचा पॅटर्न आणि इतर तपशीलसँपल पेपरमध्ये देण्यात आला आहे.
असे डाऊनलोड करा CBSE २०२४ चे सँपल पेपर :
- सर्वप्रथम CBSE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर सँपल पेपर या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला हवी असणारी इयत्ता आणि विषय निवडून ते SQP (Sample Question Paper) आणि MS (Marking Scheme) डाऊनलोड करा.
(वाचा : CBSE: सीबीएसई बोर्डाने जाहीर केले दहावी-बारावी २०२४ परीक्षेचे वेळापत्रक, जाणून घ्या केव्हा असणार अंतिम परीक्षा)
महत्त्वाचे :
CBSE दहावीचे सँपल पेपर आणि मार्किंग स्किम डाऊनलोडकरण्यासाठी येथे क्लिक करा
CBSE बारावीचे सँपल पेपर आणि मार्किंग स्किम डाऊनलोडकरण्यासाठी येथे क्लिक करा
विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी मिळते मदत :
- SQP (Sample Question Paper) आणि MS (Marking Scheme) मुळे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेची माहिती मिळण्याबरोबरच अभ्यासाची सर्वतोपरी तयारी करण्यासही मदत मिळते.
- कोणत्या विभागातून किती गुणांसाठी कोणते प्रश्न विसरले जाऊ शकतात याबद्दल अंदाज येतो.
- त्यामुळे परीक्षेची तयारी, अभ्यासाची पद्धत आणि पेपर सोडवण्याच्या विविध संकल्पनांवर व्हियातही काम करू शकतात.
परीक्षेचे वेळापत्रक जाहीर :
- सीबीएसईच्या निकालाबरोबरच बोर्डाने २०२४ च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते.
- त्यानुसार CBSE दहावी आणि बारावी या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
- दोन्ही वर्गांच्या परीक्षा ५५ दिवस चालतील आणि १० एप्रिल रोजी संपतील.
- शिवाय, २०२४ च्या जानेवारीच्या दुसऱ्या ते शेवटच्या आठवड्यात बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन केले जाणार असल्याची शक्यता आहे.
- मात्र, हे बोर्डाच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक नाही याची नोंद सर्व विद्यार्थी आणि पालकांनी घेणे आवश्यक आहे.
- त्यामुळे या वेळापत्रकात किंवा तारखांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बदलही केले जाऊ शकतात.
- परीक्षेच्या तारखांमधील बदलांविषयीची माहिती तुम्हला सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर त्या-त्यावेळी उपलब्ध होईल.शिवाय, maharashtratimes.com वरही तुम्हाला याबद्दलची माहिती मिळेल.
(वाचा : IIT Admission: आयआयटी कॅम्पस आता अबू धाबीमध्ये; युएईमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी)
अंतिम वेळापत्रक डिसेंबर किंवा जानेवारीमध्येच :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक सीबीएसई बोर्ड डिसेंबरच्याअखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. त्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून टाइम टेबल डाऊनलोडकरू शकतील. यासोबतच, संबंधित शाळा-कॉलेजांमध्येही याबद्दलची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.