Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
(जळगाव जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
जळगाव: ‘शहर महानगरपालिका क्षेत्रातील क्षेत्रसभेच्या नियमांचे होत असलेले उल्लंघन, या विषयावर चर्चा करण्यासाठी जळगाव येथील सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार पी. गुप्ता यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
क्षेत्रसभा नियमांचे पालन व्हावे आणि त्याची सक्ती देखील करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी दिपककुमार गुप्ता आग्रही होते व ती मागणी लवकरच पुर्ण केली जाईल असे आश्वासन गुप्ता यांना राज्यपालांकडून यावेळी देण्यात आले.
गेल्या कित्येक दिवसांपासून येथील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल,ओव्हर ब्रिज,रेशन मालाच्या काळाबाजार रोखण्यासाठी,अवैध वाळुसाठ्या विरूध्द तक्रारी व आंदोलने इ. लढ्यां प्रश्नी दिपककुमार गुप्ता यांचे नाव चर्चेत आहे.