Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात करिअर करायचंय; या कोर्सेसनंतर मिळणार कामाची उत्तम संधी

140

Career Opportunities in Artificial Intelligence:

एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

सध्या चॅट जीपीटी म्हणा किंवा अन्य काही अ‍ॅप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर्स, तसंच उपकरणांमध्ये होत असलेला एआय तंत्राचा वापर पाहता भविष्यात अनेक कामांची जागा मशिन्स घेणार यात दुमत नाही. एआयचे हे क्षेत्र दिवसागणिक अधिक प्रगत होत जाऊन अत्यंत वेगाने वाढत आहे. म्हणूनच, या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत.

कोर्स कुठे करता येतील?

कोर्स कुठे करता येतील?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राशी निगडित कोर्सेस आयआयटी कॉलेजेसमध्ये करता येतात. खरगपूर, दिल्ली, मुंबई, कानपूर, मद्रास, गुवाहाटी, रूरकी या शहरांतल्या आयआयटी कॉलेजेसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित कोर्सेस आहेत.

त्याशिवाय बेंगळुरूतली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नवी दिल्लीतली नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिट्स-पिलानी, बेंगळुरूतलं सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबॉटिक्स, म्हैसूरमधली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफइंजिनिअरिंग, अलाहाबादमधली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तसंच हैदराबाद विद्यापीठ या संस्थांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी निगडित कोर्सेस उपलब्ध आहेत.

मुंबईत आहे देशातील पहिले एआय विद्यापीठ :

मुंबईत आहे देशातील पहिले एआय विद्यापीठ :

देशातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात सुरु होत आहे. मुंबईजवळील कर्जत येथे AI तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचं विद्यापीठ सुरु होत आहे. AI संबंधित हे देशातील पहिलं विद्यापीठ असून, १ ऑगस्टपासून या विद्यापीठाचं पहिलं शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. त्यामुळे बहुचर्चित ‘ए आय’ तंत्रज्ञानातील शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी ही एक नामी संधी ठरणार आहे.

(अधिक माहितीसाठी वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.