Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

घरच्या घरी घ्या डिस्को क्लबची मजा! ‘हा’ खास पोर्टेबल स्पीकर एकदा पाहाच

9

नवी दिल्ली : Best Portable Speaker for home : वाढत्या टेक्नोलॉजीमुळे आजकाल घरोघरी नवनवीन तंत्रज्ञान आलं आहे. त्यामुळे अनेकजण आजकाल घरी राहून एन्जॉय करणं पसंद करत असतात. त्यात पार्टी वैगेरे घरी करायला तुम्हाला आवडत असेल किंवा घरी अगदी दमदार आवाजात गाणी ऐकायचं मन असल्यास खास पोर्टेबल स्पीकरबद्दल आम्ही सांगत आहोत. Elista या कंपनीने नुकतेच मार्केटमध्ये तीन पोर्टेबल टॉवर स्पीकर लाँच केले आहेत. स्पीकरमध्ये बिल्ड-इन आणि ब्राइट एलईडी डिझाइन सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे स्पीकरमध्ये उत्कृष्ट ऑडिओ एक्सपिरियन्स दिला गेला आहे. हा मेड इन इंडिया स्पीकर एक टॉवर स्पीकर असल्याने याचा आवाज दमदार असा लाऊड स्पीकरसारखा येतो. त्यामुळे हे स्पीकर विशेषतः पार्टीसाठी बेस्ट आहेत. चलातर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

यातील एक पोर्टेबल स्पीकर आहे ज्याचं मॉडेल ELS T-6200 AUTFB हे असून हा 30W साउंडआउटसह येते. यात 15W ट्विन स्पीकर्स आहेत. यात ८ इंच डायनॅमिक वूफर आणि ट्वीटर आहे. स्पीकर ब्लूटूथ 5.0 तंत्रज्ञान सपोर्टसह येतो. यात १० मीटर रेंजची कनेक्टिव्हिटी आहे. स्पीकरमध्ये 4,400mAh ची बॅटरी आहे. हा सिंगल चार्जमध्ये ३ तास वापरता येऊ शकते. यामध्ये LED डिस्प्ले, रोटरी व्हॉल्यूम कंट्रोल, फुल-फंक्शन रिमोट हँडसेट आणि मोबाईल फोन होल्डर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यात एलईडी डिस्प्ले आहे. यात रिमोट हँडसेट सपोर्ट देखील आहे. हा सर्वात परवडणारा स्पीकर आहे. याची किंमत फक्त ९,९९९ रुपये आहे. या स्पीकरमध्ये ही दमदार बॅटरी दिली असून ३ तासांची बॅटरी लाईफ आहे. ELS T-6200 चे फीचरही अशाचप्रकारचे आहेत.

एलिस्टा टी-5000 ब्लास्ट स्पीकर
याती आणखी एक तगडा स्पीकर हा 40W साउंड आउटपुट असणारा एलिस्टा टी-5000 ब्लास्ट स्पीकर आहे. यात 20W चे दोन स्पीकर आहेत. यामध्ये लाऊड आणि पॉवरफुल स्पीकर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. या स्पीकरमध्ये ब्लूटूथ 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. या स्पीकरची रेंज १० मीटर आहे. स्पीकरमध्ये 4400mAh बॅटरी आहे. जी देखील चांगली बॅटरी बॅकअप देते.

वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.