Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

UPSC/ MPSC म्हणजे स्पर्धा परीक्षा नव्हे.. चला समजून घेऊया काय आहे हा विषय..

46

स्पर्धा परीक्षा.. विद्यार्थ्यांच्या आवडीचा आणि सर्वाधिक चर्चेचा विषय. म्हणजे हल्ली शाळेतही पोरांना विचारलं की, तुमचे ध्येय काय? तर ते चटकन उत्तर देतात. आम्हाला आयएएस, आयपीएस व्हायचे आहे. ‘यूपीएससी’ परीक्षेतून नियुक्त केल्या जाणाऱ्या या केवळ दोन जागा आहेत. पण ‘एमपीएस/ यूपीएससी’ म्हणजेच स्पर्धा परीक्षा होय, अशी प्रतिमा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. पण वास्तवात चित्र वेगळे आहे. म्हणूनच स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे.

स्पर्धा परीक्षा ही खूप व्यापक आणि मोठी संकल्पना आहे. ज्यामध्ये शासकीय सेवेतील अनेक जागा, अनेक पदे समाविष्ट आहेत. मग त्यात राज्य शासन आणि केंद्र शासन अशा दोन्ही कडील जागांची भरती या परीक्षेद्वारे केली जाते. शासन आपल्या गरजे अनुसार पदभरती करत असते आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची जी भरती प्रक्रिया आहे. ती एका परीक्षेच्या माध्यमातून केली जाते त्याच परीक्षेला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात.

मग त्यासाठी आधी वृत्तपत्रे, प्रसार माध्यमे, अधिकृत संकेतस्थळ यावर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात दिली जाते. या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. त्यानंतर अर्जदार उमेदवारांची परीक्षा होते. मग त्यात्या पदाच्या आवश्यकतेनुसार मुलाखत, ट्रेनिंग, गुणवत्ता चाचणी पार पडते आणि मग नियुक्ती होते. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे स्पर्धा परीक्षा होय.

(वाचा : Vishwas Nangare patil: स्पर्धा परीक्षा देताय? मग विश्वास नांगरे पाटलांचा ‘हा’ कानमंत्र डोक्यात फिट्ट करा.. )

जाणून घेऊया स्पर्धा परीक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या काही मुख्य परीक्षा..

यूपीएससी(UPSC) , एमपीएससी (MPSC), स्टाफ सिलेक्शन (Staff Selection), बँकिंग (Banking), रेल्वे (Indian Railway), पोस्ट (Indian Post), संरक्षण दल (Defense) , एलआयसी (LIC) आणि अन्य काही.

अभ्यासक्रम:

स्पर्धा परीक्षांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम हा वेगळा असतो. मात्र केंद्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘यूपीएससी’ परीक्षेचा अभ्यासक्रम हा अधिक सर्वसमावेशक असतो आणि कठीणही असतो. म्हणूनच ही परीक्षा सर्वाधिक महत्वाची मानली जाते.

विद्यार्थ्यांची मानसिकता…

बहुसंख्य विद्यार्थ्यांना ‘आयपीएस’ आणि ‘आयएएस’च व्हायचे असते. तेच ध्येय त्यांनी बाळगलेले असते. त्यामुळे इतर पोस्ट आणि परीक्षांकडे पाहण्यात त्यांना रस नसतो. राज्याच्या बाबतीतही हेच आहे. ‘एमपीएससी’ देणारे विद्यार्थीही काही ठराविक पोस्ट लक्ष्य ठेवून परीक्षा देत असतात. असे ध्येय असणे चांगले असले तरी,परीक्षार्थींनी असे एकाच पदावर किंवा परीक्षेवर अडून राहता कामा नये. स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या इतरही परीक्षांचा विचार करायला हवा, जेणेकरून त्यातून अनेक संधी खुल्या होतील. म्हणूनच स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, त्या अंतर्गत किती परीक्षा येतात हेही जाणून घेणे गरजेचे आहे.

‘यूपीएससी’ आणि ‘एमपीएससी’ला इतके महत्व का?

‘यूपीएससी’ (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेचा अभ्यास हा सर्वाधिक कठीण आणि सर्वसमावेशक आहे. त्यामुळे या एका परीक्षेचा अभ्यास कसोशीने केला तर इतर अनेक परीक्षाही सहज देता येतात. त्यातील परीक्षेच्या पद्धती वगैरे बदलतात पण मूळ गाभा याच परीक्षेचा असतो. त्यामुळे ‘आयपीएस’ आणि ‘आयएएस’ ध्येय बाळगणारे विद्यार्थी तिथे अपयश आल्यास ‘एमपीएससी’, ‘स्टाफ सिलेक्शन’, ‘बँकिंग’, ‘रेल्वे’, ‘पोस्ट’, ‘संरक्षण दल’, ‘एलआयसी’ आदी परीक्षाही देऊ शकतात. हेच ‘एमपीएससी’ (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)च्या बाबतीत आहे. राज्य पातळीवरची सर्वाधिक सर्वसमावेशक परीक्षा असते. ज्या अंतर्गत पोलीस अधिकारी, तलाठी, लिपिक, अभियंता अशा सरळसेवा परीक्षा आपण देऊ शकतो.

(वाचा: Independence Day 2023: ‘स्वातंत्र्य दिन’ आणि ‘प्रजासत्ताक दिन’ यातला नेमका फरक काय? ‘या’ गोष्टी कधीही विसरू नका)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.