Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पीएसआय व्हायचंय? वाचा परीक्षेपासून पोस्टिंग पर्यंत सविस्तर माहिती…

9

अंगावर खाकी वर्दी असावी यासाठी आज लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. आपणही पोलिस होऊन तो मान मिळवावा असे अनेकांना वाटते. महाराष्ट्रात तर ‘पीएसआय’ पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असते. आज अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना पीएसआय व्हायचे आहे, पण या पदासाठी काय करायचे, कोणती परीक्षा द्यायची, पात्रता काय आहे याविषयी पुरेशी माहिती नसते. म्हणूनच पाहूया पीएसआय होण्यासाठी नेमके काय करावे लागते..

महाराष्ट्र पोलिस सेवेतील ‘पीएसआय’ हे पद अत्यंत मानाचे आहेत, ज्याला इंग्रजीत पोलिस सब इन्स्पेक्टर(Police Sub-Inspector) आणि मराठीत ‘पोलिस उपनिरीक्षक’ असा शब्द आहे. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’मार्फत म्हणजे ‘एमपीएससी’ परीक्षेतून पीएसआय पदाची भरती केली जाते. पोलीस उपनिरीक्षक हे एमपीएससी परीक्षेतील ‘गट ब’ चे अराजपत्रित पद आहे. त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी तुम्हाला एमपीएससी परीक्षेची तयारी करावी लागेल.

वयोमर्यादा:

पीएसआय पदासाठी किमान वयोमर्यादा १९ वर्षे आहे तर कमाल मर्यादा ३१ वर्षे आहे. यामध्ये मागासवर्गीय, अनाथ, प्राविण्य प्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, यासारख्या आरक्षित संवर्गामध्ये वयोमर्यादेमध्ये सूट मिळते.

पीएसआय पदासाठी शारीरिक पात्रता:


पुरूष –
कमीत कमी उंची १६५ सेंटिमीटर (पायात कोणत्याही प्रकारचे चप्पल किंवा बूट न घालता)

छाती न फुगविता ७९ सेंटीमीटर (फुगवण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर आवश्यक)

महिला –

कमीत कमी उंची १५७ सेंटीमीटर (पायात कोणत्याही प्रकारचे चप्पल किंवा बूट न घालता.)

पीएसआय परीक्षेचे टप्पे:

संयुक्त पूर्व परीक्षा १०० गुण (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)
मुख्य परीक्षा ४०० गुण (पेपर १ संयुक्त व पेपर २ स्वतंत्र)
शारीरीक चाचणी १०० गुण
मुलाखत ४० गुण

(वाचा: Career Tips: ‘या’ कारणांमुळे क्वालिफाइड असूनही व्हाल रिजेक्ट! नोकरीबाबत चुकूनही दुर्लक्ष करू नये अशा गोष्टी..)

पीएसआय परीक्षेचा अभ्यासक्रम:

चालू घडामोडी (जागतिक तसेच भारतातील)

नागरिक शास्त्र (भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), मानवी हक्क व जबाबदाऱ्या आदी..)

इतिहास (आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास)

भूगोल (महाराष्ट्रामचा भूगोल, पृथ्वीची माहिती, जगाचा नकाशा आणि सामान्य माहिती, हवामान, अक्षांश व रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे आदी..)

अर्थव्यवस्था (भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोशीय नीती आदी..)

शासकीय अर्थव्यवस्था (अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण आदी..)

सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र आदी..)

बुद्धिमापन चाचणी व अंकगणित (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी आदी..)

शारीरिक चाचणी (गुण – १००) :

पुरुषांसाठी

  • गोळाफेक (वजन ७.२६० किलो) – अंतर ७.५० मी. केल्यास १५ गुण
  • पुल अप्स (८ पुल अप्स) – प्रत्येकी २.५ गुण आणि एकूण २० गुण
  • लांब उडी ४.५० मी. – एकूण १५ गुण
  • धावणे ८०० मी. – वेळ २ मिनिटे ३० सेकंद – ५० गुण

महिलांसाठी

  • गोळाफेक (वजन ४ कि. ग्रॅ) अंतर ६ मी. – २० गुण
  • धावणे २०० मी. वेळ ३५ सेकंद – ४० गुण
  • चालणे ३ किमी. वेळ २३ मिनिटे – ४० गुण

पीएसआय होण्यासाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ४०० गुणांच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. ती परीक्षा झाल्यानंतर १०० गुणांची शारीरिक चाचणी होते, ज्यामध्ये किमान ५० किंवा त्याहून अधिक गन अपेक्षित आहेत. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर ४० गुणांची मुलाखत होते. अशी पीएसआय पदासाठी उमेदवाराला ५४० गुणांची परीक्षा द्यावी लागते.

(वाचा: Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात एसएससी आयटी एक्झिक्युटिव्हच्या पदांवर भरती, अर्ज कसा करावा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.