Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कमी बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन हवा? इथे पाहा १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे मोबाइल

10

Poco M3

Poco M3 मध्ये ६.५३ इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आणि १९.५:९ अ‍ॅस्पेक्ट रेशियो आहे. ह्यात ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफी साठी ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज मिळते, तसेच ५१२जीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. हा स्मार्टफोन १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या ६००० एमएएचच्या बॅटरीसह येतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० आधारित मीयुआय १२ वर चालतो. Poco M3 ची किंमत ११,९९९ रुपयांपासून सुरु होते.

Realme C53

Realme C53

Realme C53 मध्ये ६.७४ इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन १०८० x २४०० पिक्सल, अ‍ॅस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ आहे. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित Realme UI वर चालतो. यात ऑक्टा कोर Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे. जोडीला ६जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी ३० मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. Realme C53 च्या ४जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे.

वाचा: वनप्लसला टक्कर देण्यासाठी Samsung ची नवी चाल; ५० एमपीच्या कॅमेऱ्यासह होऊ शकते परवडणाऱ्या Galaxy S23 FE

Redmi 12C

Redmi 12C

Redmi 12C मध्ये ६.७१ इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन ७२० x १६५० पिक्सल, रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ आणि २०:९ अ‍ॅस्पेक्ट रेशियो आहे. ह्यात ऑक्टा कोर Mediatek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. ह्यात ४जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ०.०८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. तर फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी १० वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. अ‍ॅमेझॉनवर Redmi 12C च्या ४जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,७९९ रुपये आहे.

Moto G13

Moto G13

Moto G13 मध्ये ६.५ इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन ७२० x १६०० पिक्सल, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २०:९ अ‍ॅस्पेक्ट रेशियो आहे. हा स्मार्टफोन ४जीबी रॅम आणि ६४जीबी आणि ४जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज ऑप्शनसह विकत घेता येईल. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. ह्यात ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर Mediatek Helio G86 प्रोसेसरसह आला आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ई-कॉमर्स साइट Flipkart वर Moto G13 ची किंमत ९,९९९ रुपये आहे.

वाचा: आयफोनमधील जबराट फिचर मिळणार बजेट फ्रेंडली फोनमध्ये; Realme C51 लवकरच येतोय भारतात​

Poco M5

Poco M5

Poco M5 मध्ये ६.५८ इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन १०८० x २४०८ पिक्सल, रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ आणि २०:९ अ‍ॅस्पेक्ट रेशियो आहे. कंपनीनं ह्यात ऑक्टा कोर Mediatek Helio G99 प्रोसेसरचा वापर केला आहे. फोन ५०एमपी + २एमपी + २एमपी चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. ह्यात ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज मिळते, जी मायक्रोएसडी कार्डनं ५१२जीबी पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या ५००० एमएएचच्या बॅटरीसह येतो. डिवाइस अँड्रॉइड १२ आधारित मीयुआय १३ वर चालतो. Poco M5 च्या ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,४९९ रुपये आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.