Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शाओमी करणार कमाल! परवडणाऱ्या किंमतीत 18GB RAM आणि 200MP कॅमेरा; Redmi Note 13 Pro सीरिज लीक

34

Xiaomi नं Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G वर्षाच्या सुरवातीला लाँच करण्यात आले होते. आता कंपनी ह्या दोन्ही स्मार्टफोन्सचे उत्तराधिकारी लाँच करण्याची तयारी करत आहे. नवीन Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ सर्टिफिकेशन साइट TENAA वर दिसले आहेत, त्यामुळे ह्यांच्या स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती मिळाली आहे. Redmi Note 13 Pro कंपनीच्या Redmi Note 12 Pro ची जागा घेऊ शकतो. फोनमध्ये ६.६७ इंचाचा OLED डिस्प्ले आणि ५,०२०एमएएचची बॅटरी मिळू शकते.
Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ चिनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi चे नवीन डिवाइस असू शकतात.

Redmi Note 13 Pro सीरिजचे लीक स्पेक्स

चीनच्या प्रसिद्ध टिपस्टर Digital Chat Station नं दोन नवीन रेडमी स्मार्टफोनचे स्क्रीनशॉट शेयर केले आहेत, ज्यात सर्टिफिकेशन डिटेल्स आहेत. डिवाइस TENAA वर लिस्ट करण्यात आले आहेत. Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ चा मॉडेल नंबर अनुक्रमे 2312DRA50C आणि 2312DRA50C मेंशन करण्यात आले आहेत. लिस्टिंग मधून समोर आलं आहे की स्मार्टफोन ५जी सपोर्टेड असतिल. ह्यात ६.६७ इंचाचा OLED डिस्प्ले असेल. Redmi Note 13 Pro+ मध्ये 1TB स्टोरेज, १८ जीबी रॅम मिळू शकतो, तर Redmi Note 13 Pro १६ जीबी रॅमसह दिसला आहे.

वाचा: WhatsApp चं नवीन फीचर खूपच भारी, आता व्हिडीओ पाठवताना फाटणार नाही, HD मध्ये शेअर करा VIDEO

TENAA वर दिलेल्या ह्या लिस्टिंगनुसार, फोन रॅम आणि स्टोरेजसाठी ४ व्हेरिएंटमध्ये येऊ शकतात. फोनच्या मागे २०० मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर दिसला आहे, जोडीला ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. Note 13 Pro मध्ये ५,०२०एमएएचची बॅटरी, आणि Note 13 Pro+ मध्ये ४,८८०एमएएची बॅटरी मिळू शकते.

Redmi Note 12 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 12 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 1080 चिपसेट आहे जोडीला १२ जीबी रॅम आणि Mali-G68 GPU देण्यात आला आहे. मागे ५० मेगापिक्सलच्या Sony IMX766 प्रायमरी सेन्सर मिळतो. त्याचबरोबर ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ५,०००एमएएची बॅटरी ६७ वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.

वाचा: कमी बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन हवा? इथे पाहा १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे मोबाइल

Redmi Note 12 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुलएचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा MIUI 13 वर चालतो. फोनमध्ये OLED डिस्प्ले देण्यात आला आहे त्याचबरोबर १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे आणि २४०हर्ट्झचा टच सॅम्पलिंग रेट आहे. यात ९०० निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. हा HDR10+ ला सपोर्ट करतो आणि Dolby Vision सह Widevine L1 चा सपोर्ट देखील आहे. हा MediaTek Dimensity 1080 SoC येतो आणि जोडीला १२ जीबी पर्यंत रॅम आणि Mali-G68 GPU आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.