Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

झटपट कर्ज मिळवण्याच्या नादात होईल मोठी फसवणूक, ‘या’ दोन अ‍ॅप्सपासून राहा सावध, सरकारचा इशारा

10

नवी दिल्ली : Fraud Loan Apps : मागील काही वर्षांत भारतासह जगभरात ऑनलाईन फ्रॉड फारच वाढलं आहे. कारण एकीकडे टेक्नोलॉजी अ‍ॅडव्हान्स झाली असतानाच क्राईम करणारे गुन्हेगारही तितकीच अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी वापरत आहेत. यातच एक फ्रॉडचा प्रकार म्हणजे झटपट लोन पुरवतो असं सांगणारे फेक लोन अॅप्स. या फ्रॉड ऑनलाइन कर्ज पुरवण्याचं प्रॉमिस करणाऱ्या अ‍ॅप्समुळे अनेकांचा प्राणही गेला आहे, तर कितींना मोठा गंडा बसला आहे. हे लोन अ‍ॅप्स भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रमाणित नाहीत आणि कर्ज दिल्यानंतर लोकांना ब्लॅकमेल करतात. सरकारने अशा ५० हून अधिक लोन अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे परंतु दररोज नवीन अ‍ॅप्स लाँच केले जात आहेत. आता सरकारने दोन नवीन कर्ज अ‍ॅप्सबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार्‍या सायबरडोस्टने X वर एका पोस्टद्वारे सांगितले आहे की, या अ‍ॅप्सवरून कर्ज घेण्यापूर्वी त्यांची संपूर्ण माहिती घ्या. हे अ‍ॅप्स विदेशी संस्था चालवतात. तुम्ही सायबर गुन्ह्याचे बळी असाल तर, #Dial1930 डायल करा आणि http://cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवू शकता असं सांगितलं आहे. ज्या अ‍ॅप्सबद्दल सरकारने इशारा दिला आहे त्यांची नावे विंडमिल मनी आणि रॅपिड रुपी प्रो (Windmill Money and Rapid Rupee Pro) ही आहेत. सायबरडोस्टच्या या पोस्टवर, एका वापरकर्त्याने यापैकी एका अ‍ॅपबद्दल स्क्रीनशॉट तक्रार केली आहे. हे अ‍ॅप्स गैरवर्तन करत असल्याचे स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे.

यापैकी विंडमिल मनी सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, मात्र रॅपिड रुपी प्रो हे गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. या अ‍ॅप्सचा रिव्ह्हूय देखील अगदी निगेटिव्ह असून १ स्टार दिले गेले आहे. बहुतेक लोकांनी रिव्ह्यूयमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. Google Play Store वर उपलब्ध माहितीनुसार, Windmill Money अ‍ॅप STCI PRIMARY DEALER LIMITED ने विकसित केले आहे, तर STCI च्या साइटवर एक बॅनर आहे की हे अ‍ॅप या कंपनीने विकसित केले नाही आणि या अ‍ॅपचा या अ‍ॅपशी कोणताही संबंध नाही. अशा परिस्थितीत तुम्ही या अ‍ॅप्सबाबत सावध राहायला हवे.

वाचा : तुमचं Google Account कुठे-कुठे केलंय साईन इन? चेक करण्यासाठी ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.