Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नव्या अर्जदारांसह २४ व ३१ ऑक्टोबर २०२१ च्या रद्द परीक्षेतील उमेदवारही करू शकणार अर्ज; आरोग्य विभागात महाभरती

12

Maharashtra Health Department Recruitment For Group-C Cadre: महाराष्ट्र शासन, आरोग्य विभागाच्या ‘गट-क’ संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदे भरण्याची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या जागांसाठी १८ सप्टेंबर २०२३, पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र, मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील संवर्ग निहाय रिक्त पदे भरण्यसाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही पदभरती करण्यात येत आहे.

(फोटो सौजन्य : महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अधिकृत वेबसाइट)

पदभारतीचा तपशील :

महाराष्ट्र शासन, आरोग्य विभागाच्या ‘गट-क’ संवर्गातील विविध ५० हून अधिक पदांच्या ६ हजारांहून अधिक जागांसाठी ही भरती असून, पदभरतीच्या तपशील जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात पहा.

शैक्षणिक पात्रता :

पदाकरिता आवशयक असलेली शैक्षणिक पात्रता परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, पदास आवश्यक शैक्षणिक पात्रता जाहीरातीच्या शेवटच्या दिनांकास पूर्ण केलेली असावी

(अधिक महितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहीरात पहा)

(वाचा : Caste Validity Certificate साठी आता No More Waiting; विद्यार्थी हिताचा विचार करत केवळ ८ दिवसात मिळणार दाखला)

ही कागदपत्रे आवश्यक :

० शैक्षणिक / व्यावसायिक / तांत्रिक पात्रतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
० पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र / शारीरिक क्षमता
० जातीचा दाखला
० वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र
० Non-Creamy Layer Certificate
० Domicile Certificate
० संगणक हाताळणी प्रमाणपत्र
० जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक
० प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / अंशकालीन / अतिउच्च क्रीडा प्रावीण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र / स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाली असल्यास उमेदवारांचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र
० दिव्यांग उमेदवारांचे किमान ४० टक्के कायमस्वरूपी दिव्यांगाचे प्रमाणपत्र
० अनाथ असल्याचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र.
० ईडब्ल्यूएस दाखला
० इतर आवश्यक कागदपत्रे

(अर्ज भरताना वरील सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या / कागदपत्रांच्या मूळ प्रती उमेदवारांकडे असणे आवश्यक)

पात्रता आणि वयोमार्यादा :

या जागांसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
जाहीरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे :

  • अमागास आणि मागासवर्गीय उमेदवार : १८ वर्षे असून अमागास कमाल वयोमार्यादा ४० तर, मागासवर्गीय उमेदवार ४५ वर्षे ही कमाल वयोमार्यादा ठेवण्यात आली आहे.
  • प्राविण्य प्राप्त खेळाडू : ४५ वर्षे
  • अंशकालीन कर्मचारी : ५७ वर्षे
  • प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / दिव्यांग : ४७ वर्षे
  • माजी सैनिक : सैनिक दलातील सेवेचा कालावधी अधिक तीन वर्षे
  • दिव्यांग माजी सैनिक : ४७ वर्षे

(वाचा : SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ६ हजार १६० जागांसाठी भरती; देशाच्या विविध राज्यांमध्ये नोकरीची संधी)

परीक्षेचे स्वरूप :

– ‘गट-क’ पदांसाठी १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.
– या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला ०२ गुण असतील.
– विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदासाठी ८० टक्के गुण हे पडशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक पात्रतेशी संबंधित असतील, उर्वरित २० टक्के गुण मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित यांच्याशी निगडीत असतील.

(परीक्षेच्या स्वरूपविषयी अढीक महितीसाठी मूळ जाहीरात पहा)

निवड प्रक्रिया :

  • उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेद्वारे (Computer Based Online Examination) ऑनलाइन परीक्षेत मिळणार्‍या गुणांच्या आधारे करण्यात येईल.
  • उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्काविषयी :

सदर भरती प्रक्रियेत आकारले जाणारे परीक्षा शुल्क हे ना-परतावा तत्वावर घेण्यात येणार आहे

  1. अमागास : १००० रुपये
  2. मागासवर्गीय : ९०० रुपये
  3. माजी सैनिक : अर्ज शुल्क नाही (निरंक)

(वाचा : सरकारी आणि खासगी नोकरी मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील हे TOP 11 Educational Apps)

महत्त्वाचे :

  • महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट-क व गट-ड पदभरतीसाठी यापूर्वी २४ व ३१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या रद्द झालेल्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता टी.सी.एस-आय.ओ.एन. (TCS-iON) कंपांनीतर्फे घेण्यात येणार्‍या परीक्षेसाठी आवश्यक परीक्षा शुल्क भरून नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे.

  • शिवाय, सदर परीक्षेस (२४ व ३१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या रद्द झालेल्या परीक्षेस) प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी संबंधित पोर्टल (सुविधा) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर २०२१ चे परिक्षार्थी वयाधीक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परीक्षेचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्ज भरण्यास पात्र राहतील. उर्वरित सर्व उमेदवारांसाठी ३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार वयोमार्यादेत शिथिलता देण्यात येईल.

असा करा अर्ज

  1. सदर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर ‘पदभरती २०२३ ऑनलाइन अर्ज’ या लिंकवर जाऊन, अचूक महितीसह ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.
  2. इतर कोणत्याही माध्यमातून येणारे अर्ज आणि परीक्षा शुल्क ग्राही धरले जाणार नाही.
  3. उमेदवारांना १८ सप्टेंबर २०२३ रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

(वाचा : BOB फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेडमध्ये २० जागांवर पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.