Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

४१ व्या ‘प्रभात संगीत दिना’निमित्त ‘प्रभात संगीत आणि भारतीय भक्ती संगीतातील साहित्यिक व सांगितिक’ विषयावर परिसंवाद

10

Mumbai University : मुंबई विद्यापीठातील संगीत विभाग आणि संस्कृत विभाग यांच्या वतीने आज (११ सप्टेंबर २०२३) आनंद मार्ग प्रचारक संघ, मुंबईची सांस्कृतिक शाखा, रेनेसान्स आर्टिस्ट अँड रायटर्स असोसिएशन (रावा) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात संगीत आणि भारतीय भक्ती संगीतातील साहित्यिक व सांगितिक या विषयावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

(फोटो सौजन्य : मुंबई विद्यापीठ)

श्री प्रभात रंजन सरकार यांनी संगीतबद्ध केलेले भक्तिसंगीत मुंबई विद्यापीठातील संगीत विभाग, सांस्कृतिक भवन, सांताक्रूझ येथे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ४१ व्या प्रभात संगीत दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं . भवदीप जयपूरवाले यांच्या हस्ते करण्यात आले.

“प्रभात संगीत ही हृदयाची भावना आणि हृदयाची अभिव्यक्ती असून ते हृदयाच्या शाईने लिहिलेले आहे. प्रभात संगीत हा आशा आणि नवजागरणच्या गाण्यांनी बनलेला एकूण ५ हजार ०८५ आध्यात्मिक गीतांचा संग्रह आहे. प्रभात रंजन सरकार यांनी १४ सप्टेंबर १९८२ ते २० ऑक्टोबर १९९० या आठ वर्षांच्या कालावधीत संगीतबद्ध केलेले हे संगीत आहे यात शास्त्रीय ते लोकसंगीतापर्यंतचे विविध प्रकार आणि शैली यांचा यात समावेश आहे.

(वाचा : Mumbai University मध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट’ कार्यक्रमाचे आयोजन; बाबासाहेबांच्या वकिली प्रारंभाचा शताब्दी सोहळा)

डॉ. विश्वंभर जाधव, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ हे या कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आनंद मार्गाचे संस्थापक श्री प्रभात रंजन सरकार यांच्या प्रभात संगीत योगदानाची प्रशंसा केली. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. कुणाल इंगळे यांनी स्वागतपर भाषण करून यावेळी सर्व पाहुण्यांचा परिचय करून दिला.

रावाच्या कार्याचे कौतुक करत, केंद्रीय आरयू आणि रावाचे सचिव आचार्य दिव्यचेतनानंद अवधूत यांनी मुख्य भाषण केले. त्यांनी प्रभात संगीतावर तसेच संगीताच्या उत्पत्तीवर प्रकाश टाकला. “भगवान शिव यांनी संगीत तयार केले. इथे संगीत म्हणजे गाणी, नृत्य आणि वाद्य संगीत. भगवान शिवाने सर्वप्रथम सूर सप्तकचा शोध लावला.”

शिवाय, आचार्य दिव्यचेतानंद अवधूत यांनी सांगितले की, “प्रभात संगीतातील बहुतांश गाणी बंगाली भाषेत रचलेली आहेत. इंग्रजी, संस्कृत, हिंदी, उर्दू, मराठी, मैथिली आणि अंगिका यासह इतर सुमारे ५० भाषांमध्ये लिहिली गेली.”

मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्राध्यापिका डाॅ. मनीषा कुलकर्णी यांनी प्रभात संगीत गायले आणि प्रभात संगीतावर व्याख्यान दिलेे. साधकाला सांसारिक जीवनातील मर्यादा ओलांडून अध्यात्मिक आनंदाच्या सौंदर्यात प्रस्थापित होण्यासाठी प्रोत्साहन देणारी ही गाणी अतिसौंदर्यशास्त्राची अभिव्यक्ती आहेत, असे त्या म्हणल्या.

(वाचा : डॉ आंबेडकर यांना वकिलीची सनद प्राप्त होण्यास १०० वर्षे झाल्यानिमित्त चर्चासत्राचे आयोजन; विद्यापीठात पार पडला ऐतिहासिक सोहळा)

श्री प्रभात रंजन सरकार यांनी तत्त्वज्ञान, भाषा, साहित्य, संगीत, आधुनिक मानवतावाद, अर्थशास्त्र, इतिहास, विज्ञान आदी विषयांवर सुमारे ५०० पुस्तके लिहिली आहेत, याचेही त्यांनी कौतुक केले. डॉ. भाग्यश्री वर्मा, सहयोगी प्राध्यापक, इंग्रजी विभाग, मुंबई विद्यापीठ यांनी साहित्यिक विवेचन केले. डॉ. शकुंतला गावडे, एचओडी, संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ यांनी प्रभात संगीताच्या भक्तिमय पैलूवर भाष्य केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. विजय अग्रवाल, अध्यक्ष, (रावा) मुंबई आणि डॉ. प्राध्यापक कुणाल इंगळे निमंत्रक व प्रमुख, संगीत विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांनी केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.