Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील जळू येथील दोन युवक ठार;रविवार च्या मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर शहा पेट्रोल पंपा नजीकची दुर्घटना..

11

एरंडोल:-भरधाव वेगाने पारोळ्याकडून एरंडोल कडे जाणाऱ्या ट्रक ने एरंडोल कडून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात दुचाकीवरील इंद्रसिंग दगडू पाटील वय-२७ वर्षे व भूषण कौतिक पाटील वय-२२ वर्षे हे जळू येथील युवक जागीच ठार झाले. ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री घडली. ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की इंद्रसिंग दगडू पाटील व भूषण कौतिक पाटील हे दोघे युवक एरंडोल कडून एम.एच.२० एफ.क्यू ७५०५ क्रमांकाच्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने जळू येथे घरी जात असताना शहा पेट्रोल पंप नजीक पारोळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एम.एच १९ झेड.४५२७ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात इंद्रसिंग व भूषण हे दोघे युवक जागीच ठार झाले. दुर्घटना घडली असता ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला.
याबाबत नरेंद्रसिंग पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भाग ५ गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर १५७/२१ भा.द.वि कलम ३०४अ.२७९ मोटर वेहिकल अॅक्ट १३४ व १८४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक विलास पाटील,जुबेर खाटीक व विकास खैरनार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.