Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ड्रीम स्क्रीन
सर्वप्रथम ड्रीम स्क्रीन बद्दल जाणून घेऊया. हे नवीन जनरेटिव्ह एआय फीचर आहे ज्याच्या मदतीनं क्रिएटर्सना फक्त एक विचार टाइप करून शॉर्ट्स किंवा व्हिडीओमध्ये अॅड करता येईल. तसेच शॉर्ट्ससाठी नवीन सेटिंग्स देखील बनवता येईल.
हे देखील वाचा: एकदम बजेटमध्ये कारभार; १६जीबी रॅम, ६४ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Vivo T2 Pro 5G लाँच
YouTube Create
हे फीचर नव्हे तर अॅप आहे. ह्या अॅपच्या माध्यमातून व्हिडीओ क्रिएटर्सना चांगले व्हिडीओ बनवण्यास मदत मिळेल आणि प्रोसेस सोपी होईल. ह्या अॅप मध्ये क्रिएटर्सना एडिटिंग आणि ट्रिमिंगसह ऑटोमॅटिक कॅप्शनिंग, व्हॉइसओव्हर फीचर आणि फिल्टर सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ह्यात रॉयल्टी-फ्री म्यूजिक लायब्ररीचा देखील अॅक्सेस मिळेल. अशाप्रकारे अनेक AI सपोर्टेड फीचर्स ह्या अॅपमध्ये देण्यात येतील.
कोणत्या देशात उपलब्ध आहे हे अॅप
हे अॅप सध्या यूएसए, सिंगापूर, भारत, जर्मनी, कोरिया, फ्रांस, युनायटेड किंगडम आणि इंडोनेशियासह काही निवडक मार्केट्समध्ये उपलब्ध झालं आहे. हे अँड्रॉइडवर बीटा स्टेजवर उपलब्ध आहे. हे एक फ्री अॅप आहे आणि तुम्ही हे प्ले स्टोरवर जाऊन इंस्टाल करू शकता. ह्यासाठी फक्त तुम्हाला ‘युट्युब क्रिएट’ एवढं सर्च करावं लागेल. सध्या बीटा स्टेजमध्ये असल्यामुळे काही समस्या येण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा: जगातील सर्वात स्वस्त फ्लिप स्मार्टफोन लाँच; Tecno पुढे Samsung ही फेल, इतकी आहे Phantom V Flip 5G ची किंमत
ह्या अॅप्सना देणार टक्कर
युट्युबच्या नवीन फीचर्सच्या घोषणेमुळे अनेक अॅप्सना टक्कर मिळू शकते. त्या फीचर्समुळे टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्सला युट्युब चांगली टक्कर देईल, कारण ह्या दोन्ही अॅपमध्ये एडिटिंग ऑप्शन आहेत. तसेच खुद्द युट्युबचं व्हिडीओ एडिटिंग अॅप आल्यामुळे व्हीएन अॅप, कॅपकट आणि तर अनेक व्हिडीओ एडिटिंगकडे युजर्स दुर्लक्ष करू शकतात. YouTube नं सांगितलं आहे की सुमरे ७० बिलियनपेक्षा जास्त लोक रोज शॉर्ट्स पाहत आहेत. त्यामुळे नवीन AI टूल्स लाँच करून जास्तीत जास्त युजर्सना आकर्षित करण्याचा इरादा आहे.