Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
५,००० रुपयांपर्यंतचे विमानाचे तिकीट मिळेल मोफत
ह्या ऑफर अंतगर्त २६ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान Vi अॅपच्या माध्यमातून रिचार्ज केल्यावर प्रीपेड ग्राहकांना प्रत्येक तासाला मोफत फ्री फ्लाइट तिकीट जिंकण्याची संधी मिळेल. ग्राहक ह्या ऑफर अंतर्गत ५ हजार रुपयांपर्यंतचे विमानाचे तिकीट जिंकू शकतात.
हे देखील वाचा: एका छोट्या गॅरेजमधून झाली होती Google ची सुरुवात, खास Doodle मधून पाहा २५ वर्षांचा प्रवास
५०जीबी पर्यंत फ्री बोनस डेटा
जर तुम्हाला जास्त किंमतीचा तिकीट बुक करायचं असेल तरी देखील करू शकता आणि ५ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. त्याचबरोबर युजर्स ह्या ५ दिवसांच्या ऑफर दरम्यान Vi अॅपच्या माध्यमातून केलेल्या निवडक रिचार्जवर ५० जीबी पर्यंत बोनस डेटा देखील मिळवू शकतात.
इतकेच नव्हे तर कंपनी युजर्सना ४०० रुपयांपर्यंतचा खास डिस्काउंट कुपन जिंकण्याची संधी देखील देत आहेत. EaseMyTrip द्वारे अन्य गिफ्ट्ससह फ्लाइट तिकिटांवर ४०० रुपयांचा डिस्काउंट देखील मिळू शकतो. त्याचबरोरब कंपनीनं माहिती दिली आहे की ह्या ऑफर्स बद्दल किंवा इतर कोणतेही प्रश्न असल्यास ग्राहक थेट कंपनीच्या स्टोर किंवा कस्टमर केयरशी संपर्क साधू शकतात.
नोट: उपरोक्त ऑफर Vi App वरून रिचार्ज केल्यावरच मिळतील. इतर कोणत्याही थर्ड पार्टी किंवा रिटेल स्टोरवर रिचार्ज केल्यास बोनस डेटा किंवा विमान तिकीट मिळणार नाही.
हे देखील वाचा: आयफोनला टक्कर देण्यासाठी Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro मैदानात; बॅटरीची काळजी घेण्यासाठी खास सिस्टम
५जीच्या शर्यतीत वोडाफोन आयडिया मागे
विआयनं ५जी सर्व्हिस लाइव्ह केली नाही. अलीकडेच वोडाफोन आयडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अक्षय मूंद्रा ह्यांनी माहिती दिली आहे की, वोडाफोन आयडिया आपल्या ५जी सेवेसंबंधित योजनेला अंतिम रूप देण्यासाठी नेटवर्क विक्रेत्यांशी सतत बोलणी करत आहे. मूंद्रा ह्यांनी बुधवारी तिमाही रिजल्ट्सनंतर म्हटलं की, “आम्ही ५जी लाँच करण्याच्या सुरवातीच्या टप्प्यावर आहोत. ५जी येणं महत्वपूर्ण आहे आणि आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत.”