Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
२६ एप्रिल ते १६ मे या कालावधीत भरतीसाठी अर्ज घेण्यात आले होते. तर, UPSC CAPF AC लेखी परीक्षा ६ ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. आता लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक कमांडंटच्या एकूण ३२२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये बीएसएफची (BSF) ८६ पदे, सीआरपीएफची (CRPF) ५५ पदे, सीआयएसएफची (CISF) ९१ दे, आयटीबीपीची (ITBP) ६० पदे आणि एसएसबीच्या (SSB) ३० पदांचा समावेश आहे.
(वाचा : Bharati Vidyapeeth Recruitment 2023: पुण्याच्या भारती विद्यापीठात होणार ‘या’ पदावर भरती; लगेच करा APPLY)
लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे पुढे काय?
लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना तपशीलवार अर्ज (DAF) भरावा लागेल. DAF अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल. त्यासोबतच उमेदवारांना संबंधित कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रतीही सादर कराव्या लागतील. मात्र, डीएएफच्या प्रकाशनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.परंतु आयोगाने डीएएफ लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
जे DAF सबमिट करतील त्यांना PST/PET आणि MST मध्ये उपस्थित राहण्यासाठी नोडल ऑथॉरिटी अर्थात ITBP द्वारे ई-प्रवेशपत्र देण्यात येईल. PST/PET/MST मध्ये हजर होण्यासाठी उमेदवारांना वाटप केलेल्या केंद्रांवर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र इत्यादींसारखा फोटो ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे अनिवार्य असणार आहे.
UPSC असिस्टंट कमांडंट निकाल तपासण्यासाठी :
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर असिस्टंट कमांडंट रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– आता वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून लॉग इन करा.
– यानंतर, तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– UPSC असिस्टंटचा निकाल तुमच्या समोर असेल.
– निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : Google Internship 2024: गुगलमध्ये इंटर्नशीप करा आणि नोकरी मिळवा; ऑनलाइन अर्ज उपलब्ध)