Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘निवेदक’ म्हणून करता येईल करिअर; या गोष्टी आजच आत्मसात करा..

10

शिक्षण आणि मग नोकरी म्हणजेच काही करिअर नव्हे. आता तुम्ही तुमच्या कसबीवर घडवाल ते करिअर अशी स्थिती आहे. त्यात जर तुमच्याकडे काही खास कौशल्ये, कला किंवा उपजत गुण असतील तर तुम्ही त्याचाही सुयोग्य वापर करून त्या-त्या क्षेत्रात करिअर करू शकता. आज नृत्य, अभिनय, गायन, वादन अशाच कलेत उदयास आलेलल्या करिअरच्या नव्या वाटा आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे निवेदन किंवा सूत्रसंचालन.

निवेदक म्हणून तुम्ही करिअरचा विचार नक्कीच करू शकता. कारण हल्ली एव्हेंटचा काळ आला आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक निवेदक हवा असतो, मग तो कार्यक्रम संस्कृतिक असो वा राजकीय व कॉर्पोरेट इव्हेंट. त्यामुळे या क्षेत्रात बर्‍याच संधी उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणतेही शिक्षण घेतले असेल तरी या क्षेत्रात येऊ शकता. फक्त तुमच्याकडे काही खास कौशल्ये असणे आवश्यक आहे, त्या विषयीच आज जाणून घेऊया.

भाषेवर प्रभुत्व: निवेदकासाठी सगळ्यात महत्वाची असते ती भाषा. ज्या भाषेवर तुमची पकड आहे, त्या भाषेत तुम्ही निवेदन करू शकता. परंतु जी भाषा तुम्ही निवडली आहे त्या भाषेवर तुमचे प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्या भाषेतील शब्दसंपदा, वेगळेपणा हा तुम्हाला ठाऊक हवा. त्या भाषेच्या जोरावरच तुम्हाला उपस्थितांची मने जिंकायची असतात, त्यामुळे निवेदकाची भाषा ही उत्तमच असायला हवी. त्यासाठी तुम्ही संबधित भाषेतील साहित्य वाचू शकता, कलाकृती पाहू शकता ज्याने तुमचे भाषिक ज्ञान सुधारेल.

आवाज महत्वाचा: तुम्ही समोर उभे राहिलात तर भाषेनंतर लक्ष जाते ते तुमच्या आवाजाकडे. निवेदकाला अवजाशी खेळण्याचे कसब असायला हवे. कुठे आवाज मोठा हवा, कुठे लहान हवा, कुठे आवाजात भाव हवेत हे अचूक ओळखून त्याने निवेदन करायला हवे. कार्यक्रमाचे जसे स्वरूप असेल तसा आवाज त्या निवेदकाकडून अपेक्षित असतो. त्यामुळे आवाजाची त्याला उत्तम जाण हवी. एखाद्या कालाकाराप्रमाणे आवाजाचे आरोह- अवरोह तुम्हाला समजून घेता याला हवे.

(वाचा: Study Tips: विद्यार्थ्यांनो मोठी उत्तरे लक्षात ठेवणे कठीण जातय? मग पाठांतराच्या ‘या’ सोप्या टिप्स नक्की वाचा)

निरीक्षण आणि हजरजबाबीपणा: एखाद्या कार्यक्रमात तुम्ही निवेदक म्हणून सहभागी होता, तेव्हा लोक तुम्हाला बारकाईने ऐकत असतात. त्यामुळे निवेदक म्हणून आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे आपले लक्ष हवे. त्या त्यावेळी जे घडेल त्याची मांडणी हजरजबाबी पणे निवेदनातून करता याला हवी. मग एखादा विनोदी प्रसंग असो, एखादी कविता असो किंवा कोणताही भावनिक प्रसंग, त्या त्या परिस्थिती नुसार तुम्हाला मंच नियंत्रित करता यायला हवा.

संवाद कौशल्य: निवेदक म्हणजे केवळ स्वतःशी बोलणे नाही, तर निवेदकाला उत्तम संवाद कौशल्य हवे. ज्या ठिकाणी तुम्ही निवेदन करत आहात तिथल्या प्रेक्षकांशी संवाद साधत खेळीमेळीचे वातावरण ठेवून निवेदन केले तर ते अधिक भावते. निवेदक हा कार्यक्रम आणि प्रेक्षक यांच्यामधला दुवा असल्याने हा संवाद महत्वाचा ठरतो, अन्यथा निवेदक आणि कार्यकम या दोन वेगळ्या गोष्टी वाटू लागतात. त्यामुळे प्रेक्षकांना आपलेसे करून घेण्याची क्षमता हवी.

अभ्यास हवा: तुम्ही निवेदक म्हणून करिअर करत असाल तर तुम्हाला अभ्यासाची सवय हवी. कारण कोणत्याही पद्धतीचा, कोणत्याही विषयाचा कार्यक्रम तुमच्यापुढे येऊ शकतो. तेव्हा त्याला न्याय देण्यासाठी अभ्यासू प्रवृत्ती हवी. ज्या विषयावर आधारित कार्यक्रम आहे त्याचा सखोल अभ्यास करून निवेदन करायला हवे. उदा, गाण्याचा कार्यक्रम असेल तर तो कुणाचा आहे, त्याचा उद्देश काय, त्याचा इतिहास काय, त्याही गाण्यांचा इतिहास, त्यामागची पार्श्वभूमी, किस्से या सगळ्याचा अभ्यास निवेदकाने करणे अपेक्षित असते. मग जसा विषय बदलेल तसा अभ्यास असावा.
…………….

संधी अनेक: एकदा तुम्ही निवेदक म्हणून या क्षेत्रात आलात तर तुम्हाला अनेक कार्यक्रम मिळतात. राजकीय सभा, कॉर्पोरेट एव्हेंट, संस्कृतिक कार्यक्रम असे शेकडो कार्यक्रम रोज आपल्या अवतीभोवती घडत असतात. शिवाय निवेदकासोबत मुलाखतकार म्हणूनही आपण काम करू शकतो, तशा अनेक संधी विविध माध्यमांमध्ये उपलब्ध होतात. सध्या सोशल मीडिया, युट्यूब या माध्यमांमुळे डिजिटल माध्यमातीलही संधी खुल्या झाल्या आहेत. त्यात पोडकास्ट हा नवीन पर्याय देखील निवेदकांसाठी खुला झाला आहे. निवेदकांना त्यांच्या कौशल्यावर मानधन दिले जाते. अगदी एका कार्यक्रमाचे १० ते १५ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत मानधन घेणारे निवेदक आपल्याकडे आहेत.

(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.