Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दिवाळीची सुट्टी, जायचे कोणत्या मामाच्या घरी? लाडक्या भाच्यांबाबत नेटकऱ्यांना प्रश्न; सोशल मीडियावर गमतीदार Post Viral
Ladki Bahin Yojana Funny Memes: दिवाळीतच निवडणूक प्रक्रियेची धामधूम सुरू झाली असून, अवकाळी पाऊसही मागे हटायला तयार नाही. कधी नव्हे ते निवडणूक, पावसाळा आणि दिवाळी असा तिहेरी योग जुळून आल्याने नेटिझन्सच्या कल्पनाशक्तीलाही धुमारे फुटले आहेत.
दिवाळी आणि पावसाळा दरवर्षीच येतो. परंतु, विधानसभा निवडणुकीचा हंगाम पाच वर्षांतून एकदाच येतो. एव्हाना हा हंगाम सुरू झाला असला तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापू लागले आहे. दुसरीकडे उन्हाचे चटके ऑक्टोबर हीटची जाणीव करून देत असतानाच अवेळी पडणारा मनमौजी पाऊसही कधी शिडकावा, तर कधी उकाडा वाढवतो आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाला चांगलीच उकळी फुटली असून, अन्य वस्तूंचे भावही फटाक्यांतील रॉकेटप्रमाणे उंच उडत आहेत. वाढत जाणाऱ्या महागाईने फराळ खाण्यापूर्वीच चाकरमान्यांच्या तोंडचे पाणी पळते आहे. परंतु, असे कितीही अडथळे आले तरी प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे दिवाळी सण साजरा करतोच. दिवाळीतच निवडणूक प्रक्रियेची धामधूम सुरू झाली असून, अवकाळी पाऊसही मागे हटायला तयार नाही. कधी नव्हे ते निवडणूक, पावसाळा आणि दिवाळी असा तिहेरी योग जुळून आल्याने नेटिझन्सच्या कल्पनाशक्तीलाही धुमारे फुटले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर त्याबाबतच्या गमतीदार पोस्ट्स व्हायरल होत असून, यामुळे वातावरणही हलकेफुलके होते आहे. पाऊस आणि दिवाळीवर टिपणी करणारी पोस्ट व्हायरल होते आहे.
उद्धव ठाकरेंच्या एकेरी उल्लेखामुळे ठिणगी; शिवसेनेच्या नेत्यांकडून पटोलेंबाबत नाराजी, नेमकं काय म्हणाले?
‘असाच पाऊस सुरू राहिला तर अभ्यंगस्नान अंगणात आणि रांगोळी घरात काढावी लागेल.’’पाऊस आणि राजकारणाचं नातं सांगणारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना समर्पित गमतीदार पोस्टही चर्चेचा विषय ठरली आहे. ‘जोपर्यंत साहेबांची निवडणूक प्रचाराची शेवटची सभा पावसात भिजून होत नाही, तोपर्यंत पावसाळा चालूच राहणार : सूत्र’’ ही पोस्टही गमतीचा विषय ठरली आहे.
MVA Seat-Sharing: आघाडीच्या जागांचे समसूत्र; तिन्ही घटक पक्षांना ८५, १० मित्रपक्षांसाठी, २३ जागांवर आज चर्चा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारकडून आणण्यात आली. लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरकारद्वारे पंधराशे रुपये जमा केले जात आहेत. या योजनेचे दिवाळीशी नाते जोडण्यात आले असून, दिवाळीच्या सुटीला कोणत्या मामाच्या घरी जायचे…? एकनाथ मामा (ठाणे)…?, देवेंद्र मामा (नागपूर)…? की अजित मामा (बारामती)…? लाडक्या बहिणी भाच्यांपुढे प्रश्न ही पोस्टही सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते आहे.