Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

का साजरा केला जातो राष्ट्रीय शिक्षण दिन? जाणून घ्या सविस्तर इतिहास

9

National Education Day 2023: आज राष्ट्रीय शिक्षण दिन. भारतात ११ नोव्हेंबर २०२३ हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. देशासाठी या दिनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण यासाठी आजच्याच दिवसाचे औचित्य का, त्यामागची पार्श्वभूमी काय, इतिहास काय हे अनेकांना माहीत नाही. म्हणूनच राष्ट्रीय शिक्षक दिनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आज, ११ नोव्हेंबर २०२३ म्हणजेच भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा वाढदिवस. आज देशभरात त्यांची जयंती साजरी केली जात आहे आणि हाच दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी देशातील महाविद्यालय आणि शाळांमध्ये अनेक उपक्रम, खेळ, वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. शिक्षणाचे, शिक्षकांचे आणि मौलाना आझाद यांच्या कार्याचे महत्व सांगणारा हा दिवस आहे.

मौलाना अबुल कलाम आझाद हे देशाचे पहिले शिक्षण मंत्री. त्यांनी १९४७ ते १९५८ या कालावधीत शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या कलावधीत देशातील शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडले. आज शिक्षणक्षेत्रात जी प्रगती होत आहे त्याची पायाभरणी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केली आहे. म्हणूनच २००८ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आणि त्याला मान्यता मिळाली. तेव्हापासून दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.

(वाचा: NHM Ahmednagar Bharti 2023: ‘राष्ट्रीय आयुष अभियान’ अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात भरती; ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज)

इतिहास आणि महत्व:
देशाच्या शिक्षण क्षेत्रात मौलाना अबुल कलाम आझाद यांचे मोठे योगदान आहे. १९५१ मध्ये देशाच्या शिक्षण मंत्रालयाने मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिली ‘आयआयटी’ (IIT) स्थापन केली. यानंतर १९५३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) स्थापन करण्यात आला. ज्यामुळे आजही देशातील शिक्षण व्यवस्था सुरळीत चालली आहे. त्यांच्याच कार्यकाळात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि माध्यमिक शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून आझाद यांनी देशाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि देशात अद्ययावत शिक्षण प्रणाली राबवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित
मौलाना अबुल कलाम आझाद यांना १९९२ मध्ये भारत सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला होता. हा सन्मान त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे २२ फेब्रुवारी १९५८ रोजी दिल्लीत निधन झाले.

(वाचा: MPKV Bharti 2023: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे भरती; ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.