Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Amit Jaiswal Attacked: ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर शाखेतच हल्ला; पोलिसांना ‘हा’ संशय

17

हायलाइट्स:

  • शिवसेनेच्या विभागप्रमुखावर शाखेतच हल्ला.
  • ठाण्यातील श्रीरंग सोसायटी भागातील घटना.
  • हल्लेखोराला पकडून स्थानिकांनी केली मारहाण.

ठाणे: शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर शिवसेना शाखेतच हल्ला करण्यात आल्याचा प्रकार आज रात्री ८.३० वाजता ठाणे येथील श्रीरंग सोसायटी भागात घडला. हल्लेखोराने चॉपरने तीन ते चार वार केल्याने जयस्वाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ( Thane Shiv Sena Vibhag Pramukh Attacked )

वाचा:‘मी गँगस्टर होतो तर मग…’; नारायण राणेंचा शिवसेना नेतृत्वाला बोचरा सवाल

श्रीरंग सोसायटीजवळ असलेल्या शिवसेनेच्या शाखेत हा प्रकार घडला असून हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. जयस्वाल यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्लेखोरही जखमी असल्याचे समजते. आपआपसातील भांडणातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हल्लेखोराला स्थानिकांनी पकडले

ठाणे पोलिसांनी या हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या हल्ल्यात अमित जयस्वाल यांच्या कानाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराला तिथे उपस्थित असणाऱ्यांनी पकडले असून त्याला मारहाणही करण्यात आली आहे. त्यात जखमी असलेल्या हल्लेखोराला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची ओळख पटली आहे. मात्र तूर्त ओळख उघड करण्यात येत नसल्याचे पोलीस सूत्रांकडून नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जयस्वाल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

वाचा: विनायक राऊत यांच्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्या; ‘ते’ हल्लेखोर कोण?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.