Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्वतःचा ‘स्टार्टअप’ सुरू करताय? मग या सात टिप्स कधीही विसरू नका

12

Tips For Successful Startup: एखादा व्यवसाय सुरु करायचा असतो तेव्हा कल्पनेपासून ते ती कल्पना सत्यात येई पर्यंत या व्यवसायाचा प्रवास घडत असतो. सध्या तरुणांकडे व्यवसायाच्या अनेक संकल्पना आहेत, नवीन तंत्र आहे. आर्थिकतेची जोड देण्याचीही त्यांची तयारी आहे. परंतु योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही ते स्वतःचा स्टार्टअप सुरु करू शकत नाही.

स्टार्टप सुरू करायचा म्हंटलं तर कच्च्या मालापासून ते वस्तू तयार होऊन बाजारात विक्री होईपर्यंत सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. शिवाय सुरू केलेला व्यवसाय बराच काळ न थांबता सुरू राहील असे त्यांचे नियोजन करावे लागते. त्यातून अधिकाधिक नफा कसा मिळेल, तो व्यवसाय वाढीस कसा लागेल या सगळ्याचा विचार एका नव्या उद्योजकाने करणे गरजेचे आहे.

म्हणूनच एखादा स्टार्टअप सुरू करण्यासाठी महत्वाच्या असणार्‍या सात मूलभूत आणि गरजेच्या गोष्टी कोणत्या याची आज माहिती घेऊया. ज्या तुम्हाला नव्या उद्योग- व्यवसायासाठी मार्गदर्शक ठरतील.

कल्पनेचा कृती आराखडा : तुमच्या व्यवसायाविषयी तुमच्या मनात असलेली संकल्पना आधी कागदावर लिहून काढा, त्यावर सखोल अभ्यास करा. तसा व्यवसाय आधी कुणी सुरू केला असेल तर त्याचे तपशील मिळवा. त्यात तुम्हाला काय नवीन करता येईल यावर काम करा. शिवाय तुमची संकल्पना सत्यात आणण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या बाबींचा कृतीआराखडा तयार करा. जेणेकरून तो व्यवसाय साकार करायला सोपे जाईल.

मार्केटचा अभ्यास : तुमच्या व्यवसायाचे मार्केट कसे आहे. त्याला किती मागणी आहे, ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत, सध्याचा ट्रेण्ड काय आहे याचा अभ्यास करायला हवा. तुमचे स्पर्धक कोण आहेत, त्यांचे प्रॉडक्ट कसे आहे, तुमच्या उत्पादनाला दुसरे काय पर्याय आहेत याचाही विचार व्हायला. व्यवसाय उत्तम पद्धतीने चालवायचा असेल तर त्या संबधित एकूण बाजाराचे अवलोकन करणे गरजेचे आहे.

(वाचा: Maha Metro Recruitment 2023: ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन’मध्ये भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)

आर्थिक तरतूद : असं म्हणतात की एखादा व्यसवाय सुरू केला तर त्याला रुळावर यायला किमान तीन वर्षे द्यायला हवीत. व्यवसायाच्या दृष्टीने हा मोठा काळ आहे. कारण व्यवसाय म्हंटलं की अनेक जोखीमा आणि संकटे आली. त्यामुळे अशा सर्व गोष्टींना तोंड देऊन व्यवसाय उभा कारचा असेल तर भक्कम आर्थिक पाठिंबा हवा. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला लागणार्‍या भांडवलाचा विचार आणि तरतूद करणे आवश्यक आहे.

व्यवसायाची जागा : हल्ली ऑनलाइन व्यवसायाची पद्धत रूढ होत असली तरी व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा ही लागतेच. तुमच्या व्यवसायाचे स्वरूप काय आहे यावर त्यासाठी किती जागा लागणार हे ठरते. त्यामुळे जागा भाड्याने घ्या किंवा विकत घ्या, व्यवसायाच्या जागेवर बरेच पैसे खर्च होत असतात. त्याची मानसिक आणि आर्थिक तयारी असायला हवी. हे गणित चुकलं की पुढे व्यवसाय डबघाईला येऊ शकतो.

पॅकेजिंग आणि मार्केटिंग : तुम्ही काय विकताय त्यापेक्षा ते कशा पद्धतीने विकताय याला खूप महत्व आहे. तुम्ही विकलेली वस्तू वापरल्यानंतर लोक त्यावर मत देतील, पण त्यासाठी आधी त्यांनी ते खरेदी करायला हवे. त्यासाठीच वस्तूचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. हल्ली यावर बराच जोर दिला जात आहे. तुमचे उत्पादन अधिक आकर्षक कसे दिसेल, ते लोकांना कसे आवडेल आणि अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी पॅकेजिंग आणि मार्केटिंगचा अभ्यास आवश्यक आहे.

ग्राहकांचा विश्वास : तुमचे मार्केटिंग जितके दमदार असेल तितकेच प्रॉडक्टही दर्जेदार असायला हवे. तुमची विकलेले उत्पादन वापरुन ग्राहकांचा विश्वास सांपदीत व्हायला हवा. त्यामुळे वस्तू, त्याचे दर आणि दर्जा यावर मेहनत घेतली तरी ग्राहकांचा विश्वास जिंकता येतो. शिवाय त्यांची मते जाणून घेऊन आवश्यक ते बदल करणेही आवश्यक असते. ज्याचा व्यवसायावर सकारात्मक परिणाम होतो.

नफ्याचे गणित : हे सगळे करताना त्या उत्पादनातून तुमचा नफा होणे हे देखील महत्वाचे आहे. कारण वस्तूची मूळ किंमत, जागेचे भाडे, विजबिल, कर्मचार्‍यांचे वेतन, मार्केटिंग, पॅकेजिंग, विक्री या सगळ्याचा खर्च लक्षात घेऊन वस्तूचा दर ठरवायला हवा. जेणेकरून तुम्हाला नफ्याचे गणित बसवता येईल. व्यवसाय दीर्घकाळ चालायचा असले तर हे गणित आखणे महत्वाचे असते.

(वाचा: ROF Maharashtra Recruitment 2023: राज्याच्या ‘आरओएफ’ विभागात दहावी पास उमेदवारांसाठी भरती, आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.