Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इंजिनियर्ससाठी ‘एनटीपीसी’ मध्ये मोठी भरती; पगारही आहे भरपूर

12

National Thermal Power Corporation Recruitment 2023: एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या अंतर्गत भरती सुरू आहे. या भरतीद्वारे ‘अनुभवी अभियंता’ (इंजिनियर्स) या पदाच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

नुकतीच याबाबत ‘एनटीपीसी’ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २० डिसेंबर २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर ०३ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
अनुभवी इंजिनियर्स
एलेक्ट्रिकल इरेक्शन – ३० जागा
मेकॅनिकल इरेक्शन – ३५ जागा
सिविल कन्स्ट्रकशन – ३५ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १०० जागा

MahaVitaran Amravati Recruitment 2023: ‘आयटीआय’ पास उमेदवारांसाठी महावितरण अमरावती येथे मोठी भरती; आजच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित फील्ड मधील अनुभवी इंजिनीअर असावा. याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता वाचण्यासाठी ‘एनटीपीसी’च्या संकेत स्थळाला भेट द्या. त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन : ५० हजार ते १ लाख ६० हजार (मासिक)

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : २० डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०३ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.