Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पिंपरी-चिंचवड,दि.०९ :- पुण्यातील येथील तळवडे येथे
काल शुक्रवारी दुपारी
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
फटाके कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात सहा महिलांचा
होरपळून मृत्यू झाला तर आठ कामगार यात गंभीर जखमी
झाले आहेत.
या दुर्घटनेत मृत महिलांची ओळख पटवण्यात पोलिसांना
यश आलं आहे. या घटनेत आता कंपनी मालकासह
चौघांविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या प्रकरणी शिवराज एंटरप्रायजेस कंपनीचे
मालक शुभांगी शरद सुतार, शरद सुतार तसेच जागा मालक
जन्नत नजीर शिकलगार, नजीर अमिर शिकलगार (वय ७१,
दोघे रा. मोहननगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिकेचे उप
अग्निशमन अधिकारी बाळासाहेब विश्वनाथ वैद्य यांनी देहूरोड
पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या दुर्घटनेत संगीता देवेंद्र
आबदार (वय २८), पूनम अभय मिश्रा (वय ३६), लता भारत
दंगेकर (वय ४०), मंगल बाबासाहेब खरबडे (वय ४५), राधा
सयाजी गोधडे (वय १८), कमलादेवी सुरज प्रजापती (वय
६५) अशी आगीत मृत झालेल्या महिलांची नावे आहेत.
यात जखमी झालेल्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार
सुरू आहेत. शिल्पा राठोड (वय ३१), प्रतीक्षा तोरणे (वय
१६), अपेक्षा तोरणे (वय २६.), कविता राठोड (वय ४५),
रेणुका ताथोड (वय २०), शरद सुतार (वय ४५), कोमल चौरे
(वय २५), सुमन (वय ४०), उषा पाडवे (वय ४०) आणि
प्रियंका यादव (३२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या
घटनेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदी लोकप्रतिनिधींनी
शोक व्यक्त केला असून मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना
पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर
शासकीय खर्चाने उपचार करणायच्या सूचना देखील त्यांनी
दिल्या आहेत.