Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दिल्लीत रंगला ‘अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार-२०२३’ प्रदान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते

8

नवी दिल्ली,दि.१६:- केंद्रीय रेल्वे वाहतूक आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी ६८व्या केंद्रीय रेल्वे सप्ताह सोहळ्यात रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सर्वोत्तम कार्यपद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले.
‘अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार-२०२३’ भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. विभागीय रेल्वे/पीएसयूंना विशिष्ट क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी शिल्ड प्रदान करण्यात आली. रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री, श्रीमती दर्शना जरदोश या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या; यावेळी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्य़कारी अधिकारी आणि सदस्य, सर्व विभागीय रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वेच्या उत्पादन युनिटचे प्रमुख आणि रेल्वेचे सार्वजनिक उपक्रम अधिकारी उपस्थित होते.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

देशभरातील एकूण विविध विभागीय रेल्वे, उत्पादन युनिट आणि रेल्वे सार्वजनिक उपक्रम (PSUs) मधील १०० रेल्वे कर्मचारी (५० अधिकारी आणि ५० कर्मचारी) यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवांसाठी २१ शिल्डसह सन्मानित करण्यात आले. दि. १६.०४.१८५३ रोजी भारतातील पहिली ट्रेन धावल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा केला जातो. रेल्वे सप्ताहादरम्यान, संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात

वर्ष २०२३ साठी, ७ मध्य रेल्वे अधिकार्‍यांच्या (३ अधिकारी आणि ४ कर्मचारी) सेवांना प्रतिष्ठित सन्मान देण्यात आला.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत.

झोनमध्ये ६३ स्टॉल्सची स्थापना करून ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ (OSOP) उपक्रमाद्वारे ‘वोकल फॉर लोकल’ व्हिजनला सक्रियपणे प्रोत्साहन दिले.
सार्वजनिक खरेदीमध्ये कार्यक्षमता, पारदर्शकता आणि गती वाढवण्यासाठी सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) द्वारे खरेदीवर महत्त्वपूर्ण भर दिला.
“कॅन्साइनीच्या शेवटी एचएसडी तेलांच्या थेट वितरणासाठी बाउझर सेवेचा परिचय”, आणि “विकसित विविध प्रशिक्षण मॉड्यूल्सद्वारे शिकणे हे दररोजच्या कामाचा एक भाग बनवणे” यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले.
3) कार्मिक विभाग शिल्ड – कर्मचारी कल्याणासाठी घेतलेल्या विविध ऑनलाइन उपायांसाठी

ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम (HRMS) मॉड्युल्स जसे की ई-पास, सेटलमेंट, आणि भविष्य निर्वाह निधी (PF) मॉड्यूल्समध्ये सर्वोच्च कामगिरी.
ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतींद्वारे १००% तक्रारींचे निराकरण केले. सर्व ३९२ CA III आणि १३१९ केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) अंतर्गत तक्रारी वेळेत निकाली काढल्या. ई-संवाद ही एक अनोखी संवाद प्रणाली सुरू करण्यात आली आहे जिथे कर्मचारी थेट आस्थापना अधिकाऱ्याशी ऑनलाइन संवाद साधू शकतात.
वर्षभरात सुरक्षा श्रेणीमध्ये १२५६६ पदोन्नती दिल्या.
वर्षभरात ८४५ सामान्य सेवानिवृत्ती व्यतिरिक्त (ONR) प्रकरणे वेळेत निकाली काढली.
वर्षभरात वेळेत ६१६ अनुकंपा ग्राउंड अपॉइंटमेंट्स (CGA) दिल्या.
मध्य रेल्वेने वर्षभरात २३५ पैकी २३५ न्यायालयीन खटले जिंकले, ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.
मध्य रेल्वेने ९२५०० कर्मचारी सक्षम प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणासाठी पाठवले, ज्यात ९८% पुरुष आहेत.
४) पर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड – सौर ऊर्जा आणि इतर ऊर्जा संवर्धन उपायांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि स्वच्छतेच्या कामगिरीसाठीची ही सलग चौथी वेळ

१५३५ KLD स्थापित प्रक्रिया क्षमतेचे ९ जलशुद्धीकरण प्रकल्प (लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २ आणि अहमदनगर, नाशिक रोड, अकोला, खांडवा, कोपरगाव, सोलापूर आणि साईनगर शिर्डी येथे प्रत्येकी १) सुरू करणे.
१.५३ लाख रोपे आणि ३ मियावाकी वृक्षारोपण (वाडी, सोलापूर आणि अहमदनगर स्टेशन)
२०५ kW अक्षय ऊर्जा स्त्रोत विविध ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (५), दादर (५) आणि कुर्ला, घाटकोपर आणि विक्रोळी येथे प्रत्येकी १ अश्या १७ मेघदूत मशिन बसवण्यात आल्या आहेत.
१२ ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स (बार्शी टाउन, जिंते, पारेवाडी, वाशिंबे, पुणे (डिझेल शेड), पुणे (संगम पार्क कॉलनी), खडकी, कोल्हापूर (रिटायरिंग रूम), चिंचवड कॉलनी, भिगवण, सांगली आणि मिरज)
मनमाड, खांडवा, बडनेरा आणि सोलापूर येथील कोचिंग कॉम्प्लेक्स मध्ये ४ कंपोस्ट प्लांट कार्यान्वित.
मध्य रेल्वेच्या वतीने महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्या हस्ते वरील ४ उत्कृष्ट विभागाचे शिल्ड स्वीकारण्यात आले. हे पुरस्कार प्रवासी सेवा आणि भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाप्रती मध्य रेल्वेचे समर्पण, वचनबद्धता आणि निष्ठेची साक्ष आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.