Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मध्य रेल्वे पुणे विभागातील विशेष गाड्यांचा प्रवास कालावधी ४५५ फेऱ्यांकरीता तपशील
– अमरावती-पुणे (०१४४०)- व्दिसाप्ताहिक विशेष ट्रेन एक एप्रिलपर्यंत दर शनिवार आणि सोमवारी असेल. (२६ फेऱ्या वाढविल्या)
– कोल्हापूर-पुणे स्पेशल (दररोज) (०१०२४) : ३१ मार्च पर्यंत असेल. (९१ फेऱ्या वाढविल्या)
– पुणे-कोल्हापूर विशेष (दररोज) (०१०२३) : ३१ मार्च पर्यंत असेल. (९० फेऱ्या वाढविल्या)
– नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष (०२१४४) : दर गुरुवारी १५ फेब्रुवारीपर्यत धावेल ( ७ फेऱ्या)
– पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष (०२१४३) : दर शुक्रवारी १५ फेब्रुवारीपर्यंत धावेल ( ७ फेऱ्या)
– पुणे-हरंगुळ आणि हरंगुळ-पुणे विशेष (दररोज- ३१ मार्चपर्यंत चालविण्यात येणार (प्रत्येकी ९१ फेऱ्या)
– सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक विशेष- २६ मार्चपर्यंत धावेल (१३१फेऱ्या)
महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा
मध्य रेल्वेनं पुणे विभागातून सुटणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांना पुढील तीन महिने मुदतवाढ दिलेली आहे. यामुळं महाराष्ट्र राज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. पुणे- अमरावती, कोल्हापूर-पुणे, नागपूर-पुणे, पुणे हरंगुळ, आणि सोलापूर एलटीटी या दरम्यानच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळं पुढील तीन महिने या मार्गावरुन रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या गाड्यांचे तिकीट आरक्षण येत्या दोन दिवसात सुरु होणार आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.