Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्याच्या पशुधन विकास मंडळात भरती; आजच करा अर्ज

10

Department of Animal Husbandry Recruitment 2023: राज्याच्या पशुसंवर्धन विभाग यांच्या अंतर्गत येणार्‍या महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर आस्थापनेत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ही भरती पुणे येथील युनिटसाठी होणार आहे. याद्वारे ‘अभियांत्रिकी पदवीधर’ पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २९ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

AAI Recruitment 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे महाभरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

‘महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
अभियांत्रिकी पदवीधर – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार कम्प्युटर सायन्स किंवा इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी विषयातून अभियांत्रिकी पदवीधर असावा. तसेच संबधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा.

नोकरी ठिकाण : पुणे आणि नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, बैल पालन केंद्र परिसर, बडा हनुमान मंदिराजवळ, तेलंगखेडी, सिव्हिल लाईन्स, नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २९ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.