Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘माझगाव डॉक’ यांच्या वतीने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ११ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर शुक्रवार २२ डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
अप्रेंटीस/ प्रशिक्षणार्थी – (पदसंख्या नमूद केलेली नाही)
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर, अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी पदवीधर असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता जाहिरातीत नमूद केली आहे. जाहिरात वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – २२ डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जानेवारी २०२४
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती करिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ११ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.