Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘टॉयलेट सेवा’ मोबाईल ॲपचे उद्‍घाटन, पुण्यातील

8

पुणे,दि.२२:- पुणे शहरातील स्वच्छता गृहांची माहिती एका क्लीकवर मिळणार आहे. ‘टॉयलेट सेवा’ हे मोबाईल ॲपचे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी उद्‍घाटन दि.२१ रोजी केले. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना हे ॲप उपयुक्त पडणार आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, ॲप विकसित करणारे अमोल भिंगे आदी यावेळी उपस्थित होत्या.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले,कि जास्तीत जास्त नागरिकांनी हे ॲप वापरावे. त्यांच्या सूचना, तक्रारींची दखल घेऊन सुधारणा केली जाईल.

अमोल भिंगे म्हणाले, पुणे शहरातील खासगी आस्थापनांमधील स्वच्छता गृहांसह पुणे महापालिकेच्या १२२४ पैकी ११८४ स्वच्छतागृहांची माहिती या ॲपवर उपलब्ध आहे. पुणे महापालिकेसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

या ॲपमध्ये गुगल मॅपच्या लोकेशनवरून एक किलोमीटर परिसरातील खासगी तसेच पुणे महापालिकेच्या स्वच्छतागृहांची माहिती मिळेल. महापालिकेच्या ॲपची स्वतंत्र यादी तयार केली जाईल. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

सध्या सुरू असणारया २०२३ च्या अनुषंगाने च्या माध्यमातून शौचालय प्रतवारी करून शहर पातळीवर स्वच्छ शौचालाय स्पर्धा राबविल्यास शौचालय व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होऊन नागरिकांना योग्य सोयीसुविधा देण्यात येतील. याकरिता स्वच्छ शौचालय स्पर्धा पुणे शहरभर राबविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून उत्कृष्ट पाच शौचालयांपैकी एका शौचालयाची निवड अंतिम फेरीकरिता केली जाणार आहे. शहर पातळीवर
या १५ शौचालयांमधून तीन उत्कृष्ट शौचालय निवडले जातील. सदर स्पर्धेचा कालावधी लागतो ०१ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ असा असणार आहे. एकूण १०० गुणांकरिता मानांकन ३० गुण, वापर ३० गुण व प्रत्यक्ष निरीक्षण मापदंड)- ४० गुण हे स्पर्धेचे निकष असतील.
स्पर्धेचे परीक्षण करण्याकरीत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येकी एक अश्या एकूण १५ समिती व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती कार्यरत असतील. केंद्रित स्तरावर अपेक्स कमिटीचे सदस्य पत्रकार,
स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, सफाई कर्मचारी आयोग प्रतिनिधी इत्यादी सदस्य असणार आहेत व विकेंद्रित स्तरावर मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी इत्यादी सदस्य असणार आहेत. महापालिका सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष राहतील व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती चे अध्यक्ष उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन असणार आहेत. परीक्षणाबाबत सदस्यांमध्ये मतभिन्नता अढळल्यास अंतिम निर्णय अध्यक्षांचा असेल. शौचालयांचे वापरकर्त्यांना अपेक्षित सेवा सुविधा देणे व उत्कृष्ठ शौचालयांना सर्वज्ञात करणे असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

‘टॉयलेट सेवा’ ॲपवरून नागिरकांना खासगी किंवा महापालिकेचे स्वच्छतागृह स्वच्छ आहे की अस्वच्छ, येथे असलेल्या सुविधांवरून त्याला अभिप्राय देता येईलच.

शिवाय नागरिकांकडून रेटिंग दिले जाणार असल्याने त्यावरून खासगी संस्था, हॉटेल, चित्रपटगृह, यासह इतर व्यावसायिकांना त्यांचे स्वच्छतागृह स्वच्छ व सर्व सुविधांनी तयार ठेवावे लागेल. स्वच्छतागृह चांगले असेल तर त्याचा फायदा व्यवसायासाठी होऊ शकेल, असे भिंगे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.