Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचा अवैधरित्या देशी विदेशी दारु वाहतुक व विक्री करणाऱ्यावर छापा…
वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/१२/२३ सकाळी ६.०० वा चे दरम्यान पथकाला गोपनिय माहीती मिळाली की एक ईसम वर्धा शहरात आपले चारचाकी वाहनातुन देशी विदेशी दारुची वाहतुक करणार आहे या खात्रीशीर माहीतीवरुन सकाळी ५.३० वा ते दरम्यान महादेवपुरा येथे नाकाबंदी केली असता एक चारचाकी हुंडाई कंपनीची आय – 20 क्र एम.एच. 14 सी.के 3648 सिल्वर रंगाची ही येतांना दिसली सदर वाहनास थांबवुन चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव
इमरान सत्तार शेख वय ३४ वर्ष रा. रत्नीबाई शाळेच्या मागे, महादेवपुरा वर्धा
असे सांगितले त्याचे गाडीची तपासनी केली असता त्यात
१) १८० एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॅायल स्टॅग (आर.एस) कंपनिच्या ३ खरड्याचे पुर्ण खोक्यामध्ये एकुण १४४ बाटल्या नग ३५०/-रू प्रमाणे एकुण 50,400/-रू.
२) १८० एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या मॅकडॅानल्ड नं १ कंपनिच्या 3 खरड्याचे पुर्ण खोक्यामध्ये एकुण १४४ बाटल्या प्रति नग ३५०/- रू प्रमाणे एकुण ५०,४००/-रू.
३) १८० एम.एल.च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ॲाफिसर चॅाईस ब्लु कंपनिच्या ३ खरड्याचे पुर्ण खोक्यामध्ये एकुण १४४ बाटल्या प्रति नग ३००/-रू प्रमाणे एकुण ४३,२००/-रू.
४) १८० एम.एल. च्या विदेषी दारूने भरून असलेल्या ॲाफीसर चॅाईस कंपनीच्या ५ खरड्याचे पुर्ण खोक्यामध्ये एकुण २४० बाटल्या प्रति नग २५०/- रू प्रमाणे एकुण ६०,०००/-रू.
५) १८० एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या मॅजीक मुमेंट कंपनीच्या दीड खरड्याचे खोक्यामध्ये एकुण ७२ बाटल्या प्रति नग ४००/-रू प्रमाणे एकुण २८,८००/-रू.
६) ५०० एम.एल.च्या बियर दारूने भरून असलेल्या टु-बर्ग कंपनिच्या 2 खरड्याचे पुर्ण खोक्यामध्ये एकुण ४८ टिन कॅन प्रति नग ३००/-रू प्रमाणे एकुण १४,४००/-रू,
७) ९० एम.एल. च्या देशी दारूने भरून असलेल्या टॅगो कंपनिच्या अक खरड्याचे पुर्ण खोक्यामध्ये एकुण १०० बाटल्या प्रति नग ८०/-रू प्रमाणे एकुण ८,०००/-रू.,
८) एक Intel कपंनीचा साधा मोबाईल त्या मध्ये वी.आय कपंनीचे सिम क्र ८८८८६११४२९ की. १,000/- रू
९) एक सिल्व्हर रंगाची ह्युंदाई कंपनीची i20 गाडी अंदाजे किंमत ६,०००००/- असा एकुण जु. किंमत ८,५६,२००/-रू. चा माल मिळुन आल्याने आरोपी
१) इमरान सत्तार शेख वय ३४ वर्ष रा. रत्नीबाई शाळेच्या मागे, महादेवपुरा वर्धा
२)मुकेश जयस्वाल रा.कलंब जि. यवतमाळ (बारमालक) फरार
यांचे विरोधात पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्र १६४४/२०२३ कलम ६५ अ ई, ७७ अ, ८२,८३, म.दा.का.सहकलम ३ (१) १८१, १३०/१७७ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करुन वर्धा शहर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे, यांचे आदेशानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनावर त्यांचे पथकातील पोलिस हवालदार अमर लाखे,पोलिस शिपाई पवन निलेकर,मंगेश चावरे,समीर शेख यांनी केली
सदर गुन्हयात एकुन 8,56,200/-रू. चा माल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करून पो.स्टे.वर्धा षहर यांचे ताब्यात देण्यात आले.