Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
त्र्यंबकेश्वरमधील एका महिलेला करोनाच्या ‘जेएन वन’ संसर्गाची लागण झाल्याचे वृत्त पसरल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, सदर महिलेला कोणत्या व्हेरिएन्टचा संसर्ग झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर रुग्णालयात तिच्यावर प्रसूतीपूर्व उपचार सुरू होते. प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने तीन दिवसांपूर्वी महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे सोमवारी (दि. २५) सायंकाळी रुग्णाला काही प्रमाणात खोकला व कफ जाणवल्याने ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. त्यात महिला करोना संशयित असल्याचे समोर आल्याने ‘जीनोम सिक्वेंसिंग’चा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरच नाशिकमध्ये करोनाच्या नव्या संसर्गाची लागण झाली का, हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा शासकीय रुग्णालयाने खबरदारी घेत सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.
– सिन्नर व दोडीच्या रुग्णांचा ‘आरटीपीसीआर’ अहवाल प्रलंबित
– त्र्यंबकेश्वरची महिला जास्त नागरिकांच्या संपर्कात नव्हती
– महिलेसह तिचे बाळ सुस्थितीत; संपर्कातील व्यक्तींची चाचणी
– महापालिका, जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणेचा आढावा
– जिल्हा शल्य चिकित्सकांकडून आज (दि. २७) डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयाची पाहणी
करोना संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णालयांचा आढावा घेतला आहे. नागरिकांनी सतर्क राहणे अपेक्षित आहे. सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे आहेत. जिल्हाभरात ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर देण्याचे निर्देश दिले आहेत – डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक
लॅब कार्यान्वित
जिल्हा रुग्णालयाची लॅब कार्यान्वित आहेच. परंतु, करोना काळात सुरू असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आणि मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅब बंद आहेत. येत्या आठवडाभरात त्या सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही महापालिकांना रॅपिड टेस्ट किटचाही पुरवठा जिल्हा रुग्णालयाकडून केला जाणार आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News