Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- पतीने स्वतःचा गळा कापून केला आत्महत्येचा प्रयत्न
- कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल
- मध्यरात्री घडलेल्या घटनेनं शहरात खळबळ
या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जोडपं मध्यवर्ती बस स्थानकात आलं होतं. या दोघांमध्ये वादावादी सुरू होती. काही काळानंतर हा वाद आणखीनच वाढला आणि संबंधित व्यक्तीने रागाच्या भरात स्वतःचा गळा चिरला. या पुरुषासोबत असलेल्या महिलेने ही घटना पाहताच आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना जमवलं.
मध्यवर्ती बस स्थानकातील पोलीस व वाहतूक पोलीस यांनी पुढाकार घेत सदर व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालय दाखल केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती आणि महिला हे दोघे पती-पत्नी असून काही कौटुंबिक वादामुळे सदर व्यक्तीने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जखमी व्यक्तीवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर जबाब घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली.