Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराफाच्या दुकानात चोरी करणाऱ्या महीला कर्मचारी तहसील पोलिसांचे ताब्यात…

11

ज्वेलर्स दुकानातुन चोरी करणा-या महिला कर्मचारी आरोपींना अटक, एकुण ८६,१८,१६८/- रू चा मुद्देमाल जप्त…

 नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  तहसिल हद्दीत ईतवारी, सराफा मार्केट, भाजीमंडी येथे फिर्यादी शंतनु दिपक चिमुरकर वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. ५३, रेशीमबाग यांचे चिमुरकर ब्रदर्स ज्वेलर्स नावाचे दुकान असुन सन २०१९ ते दिनांक ३०/०८./२०२३ चे दरम्यान दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचारी यांनी दुकानातील सोन्याचे विविध दागिने एकुण १४५० ग्रॅम किमती ८७,००,०००/- रू चे व १०.५ किलो चांदीचे दागिने व वस्तु किमती ७,३५,००० /- रू असा एकुण ९४,३५,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन तहसिल येथे दिनांक २५.१२.२०२३ रोजी कलम ३८१ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा तपास करीत असतांना  तहसिल पोलिसांनी  यातील आरोपी महीला

१) सौ. अस्मीता उर्फ स्वाती प्रकाश लुटे वय ३९ वर्ष रा.प्लॉट नं. १६२, वर्धमान नगर, देशपांडे ले-आउट, नागपूर

२) सौ. प्रिया प्रणव राउत वय ३० वर्ष रा. नाका नं. ४, पवनगाव रोड, कळमणा, नागपूर

३) पुजा राजाराम भनारकर वय २० वर्ष रा. नंदगिरी रोड, पाचपावली, नागपूर

४) सौ कल्याणी मनोज खळतकर वय ३३ वर्ष रा. प्लॉट नं. १७४, श्रीकृष्ण नगर, नंदनवन, नागपूर

५) सौ. भाग्यश्री पवन इंधनकर वय ३० वर्ष रा. तिननल चौक, तहसिल, नागपूर

यांना दिनांक २६.१२.२०२३ रोजी अटक केली होती. तसेच आरोपी

६) मनिषा ओमप्रकाश मोहुर्ले वय ३८ वर्ष, रा. प्रेमनगर, झेंडा चौक, शांतीनगर, नागपूर

हिला दि. २९/१२/२०२३ रोजी अटक करण्यात आली होती. अटक आरोपींची मा. न्यायालयातुन पोलिस कोठडी प्राप्त करण्यात आली होती. तपासा दम्यान महिला आरोपी क्र. १) हिचे कडुन सोन्याचे दागिने ५३३ ग्रॅम व चांदीचे दागिने ५४५१ ग्रॅम असा एकुण किमती ३६,११,०८५/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी क्र. २) हिचे कडुन सोन्याचे दागिने ३६७ ग्रॅम व चांदीचे दागिने १९३५ ग्रॅम असा एकुण किमती २३,५०,५५७/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी क्र ३) हिचे कडुन सोन्याचे दागिने ११९ ग्रॅम व चांदीचे दागिने १३७३ ग्रॅम असा एकुण किंमत ८,२२,०४५/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी क्र. ४) हिचे कडुन सोन्याचे दागिने ४६ ग्रॅम व चांदीचे दागिने ३२४ ग्रॅम व रोख ५०,०००/- रू असा एकुण किमती ३,५१,४१५/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी क. ५) हिचे कडुन सोन्याचे दागिने ७८ ग्रॅम व चांदीचे दागिने ३३० ग्रॅम असा एकुण किमती ४,९६,७८८/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी क्र. ६) हिचे कडुन सोन्याचे दागिने १६४ ग्रॅम एकुण किमती॥९,८६,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील सर्व आरोपींचे ताब्यातुन एकण सोन्याचे दागिने वजन १३१०.३३ ग्रॅम प्रती ग्रॅम ६,००० /- रू प्रमाणे ७८,६१,९८०/- रू चा मुद्देमाल तसेच चांदीचे दागिने व वस्तु वजन ९४१५.८५ ग्रॅम किमती ७,०६,१८८/- रू चे असा एकुण ८६,१८,१६८/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील कामगिरी पो.उपायुक्त परिमंडळ. ३,गोरख भामरे सपोआ कोतवाली विभाग श्रीमती शर्मा मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक विनोद पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे संदिप बुआ, पोउपनि सदाशिव कनसे, पोहवा संजय शाहु, संदिप गवई, शेखर समुद्रे, पोलिस शिपाई
रोहिदास जाधव, वैभव कुलसंगे, कुणाल कोरचे, मपोहवा. सरला, प्रांजली, ज्योती, भावना, सुनीता, मपोअ. अश्विनी भामले, प्राची मिश्रा व निर्मला यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.